"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा लावला
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २७:
{{बदल}}
 
'''इंदूर''' हे भारताच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.
 
हे शहर फार पुरातन आहे. [[पहिले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांसोबत]] मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा [[माळवा]] या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
 
इंदूरच्या मध्यात उभा असलेला होळकरांचा राजवाडा आजही मराठी साम्राज्याचा इतिहास सांगतो.
 
शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम.
 
== वैशिष्ट्ये ==
इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे असं दोन भागात आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==
* सिद्धकाली मंदिर
* गोमतगिरी - जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
* [[नखराली ढाणी]] - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
* अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त [[वेदपाठशाळा]] (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप [[वेद]] आहेत. येथील [[अन्नपूर्णा]] देवीची [[यात्रा]] [[त्र्यंबकेश्वर]] येथे जाते.
* काचमंदिर
* जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
* मल्हारी मार्तंड मंदिर - [[शिवलिंग]], मध्यभागी गणेशमूर्ती व [[नटराज]]मूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांची [[मूर्ती]] आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
ओळ ५२:
* बाणेश्वर
* [[सहस्रार्जुन]] मंदिर - महिष्मती या नगरीचा प्राचीन सम्राट
* श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे [[वासुदेवानंद सरस्वती महाराज]] यांचे गंडाबंधन झाले होते.
* इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
 
== वाहतूक ==
[[देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ]] इंदूरपासून ८ किमी अंतरावर स्थित असून तो मध्य प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून [[दिल्ली]], [[मुंबई]], [[पुणे]], [[कोलकाता]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. [[इंदूर रेल्वे स्थानक]] [[पश्चिम रेल्वे]]वरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून [[इंदूर दुरंतो एक्सप्रेस]], [[माळवा एक्सप्रेस]], [[अवंतिका एक्सप्रेस]] इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.
 
[[मुंबई]] ते [[आग्रा]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[अहमदाबाद]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९]] व [[बैतुल]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९ ए]] हे [[राष्ट्रीय महामार्ग]] इंदूरमधून जातात.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[इंदूर (निःसंदिग्धीकरण)]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.manogat.com/node/12303 इंदूर शहराचे प्रवासवर्णन(मराठी)]
* [http://www.manogat.com/node/12310 इंदूरची खाद्ययात्रा(मराठी)]
 
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:इंदूर| ]]
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:इंदूर जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले