"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''फॅसिझम''' हे २०व्या शतकाच्या सुरुवातीस [[मध्य युरोप|मध्य-युरोपात]] ठळकपणे दिसू लागलेले, मूलगामी [[हुकुमशाही|अधिकारशाही]] [[राष्ट्रवाद|राष्ट्रवादाचे]]ाचे एक रूप आहे. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणार्‍यांना ''"फॅसिस्ट"'' म्हटले जाते. [[राष्ट्रीय सिंडिकेटवाद|राष्ट्रीय सिंडिकेटवादाने]]ाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] दरम्यान [[इटली]]मध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा [[उजवी विचारसरणी|उजव्या विचारसरणीच्या]] भूमिकेचा आणि [[डावी विचारसरणी|डाव्या विचारसरणीच्या]] राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य [[उदारमतवाद]], [[मार्क्सवाद]] आणि पारंपरिक [[पुराणमतवाद]] ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपरिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते, पण काही समीक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.
 
राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका [[हुकुमशाही|सर्वंकषसत्तावादी]] राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. जो पक्ष फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनःस्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल अशा पक्षाची निर्मिती हे फॅसिस्टांचे ध्येय होते. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रती भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि [[लष्करसत्तावाद|लष्करसत्तावादावर]]ावर विशेष जोर, वगैरे.. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि [[साम्राज्यवाद]] ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.
 
फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. [[इटली]] येथील [[बेनितो मुसोलिनी]] आणि [[जर्मनी]] येथील [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तिमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुश सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धान्त, संकल्पना आणि संज्ञा हे [[समाजसत्तावाद|समाजसत्तावादाकडून]]ाकडून उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी [[वर्गसंघर्ष|वर्गसंघर्षाचा]]ाचा मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि [[वंशवाद]] ह्यांना स्वतःचा आधार बनवले. स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधणे ह्या मुख्य उद्देशाने फॅसिस्ट लोक [[मिश्र अर्थव्यवस्था|मिश्र अर्थव्यवस्थेचे]] समर्थन करतात.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. असे असले तरी, "फॅसिस्ट" ही संज्ञा राजकीय विरोधकांद्वारे बहुधा तिरस्कारवाचक म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ह्या संज्ञा वापरल्या जातात.
 
== व्युत्पत्ती ==
ओळ १२:
फॅसेस हे चिन्ह ''एकतेच्या बळाचे'' प्रतीक होते : एकटी काडी सहज मोडेल, पण त्यांचा गुच्छ मोडायला कठीण असतो. विविध फॅसिस्ट चळवळींनी अनेक तत्सम चिन्हे विकसित केली होती. उदाहरणार्थ, "falange" (''फॅलांज'') ह्या चिन्हात एका जोखडाला एकत्र जोडलेले पाच बाण असत.
 
"Fascismo" ''(फॅसिझ्मो)'' चे इटालियन मधून [[इंग्रजी]]त भाषांतर करताना "Fascism" ''(फॅसिझम)'' झाले. इंग्रजीतून ''"फॅसिझम"'' ही संज्ञा [[मराठी]] साहित्यात जशीच्या तशी वापरण्यात आली. पण मराठीत ''"फॅसिस्टवाद"'' असाही समानार्थी शब्दप्रयोग केला जातो. [[हिंदी|हिंदी भाषेत]] ह्याला ''"फ़ासीवाद"'' ही संज्ञा वापरली जाते.
 
== व्याख्या ==
ओळ २४:
 
अनेक विद्वानांनुसार, फॅसिझमने (विशेषतः सत्तेत आल्यानंतर) ऐतिहासिकपणे साम्यवाद, पुराणमतवाद आणि सांसदीय उदारमतवादावर हल्ला चढवून प्रामुख्याने कट्टर उजव्या विचारसरणीच्या ताकदींकडून समर्थन मिळवले आहे.
 
=== विचारधारांच्या मोजपट्टीवर फॅसिझमचे स्थान ===
 
==="फॅसिस्ट" शब्दाचा तिरस्कारवाचक वापर ===
 
== इतिहास ==
 
=== ''फें दा स्येकल'' आणि मॉरासवादाचा व सोरेलवादाचा संगम (१८८० - १९१४) ===
 
=== पहिले महायुद्ध आणि परिणाम (१९१४ - १९२९) ===
 
=== महा-मंदीचा आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि दुसर्‍या महायुद्धाकडे वाटचाल (१९२९ - १९३९) ===
 
=== दुसरे महायुद्ध (१९३९ - १९४५) ===
 
=== दुसर्‍या महायुद्धानंतर (१९४५ - सद्य) ===
 
== विचारधारा ==
 
=== राष्ट्रवाद ===
राष्ट्रवाद हा फॅसिझमचा मुख्य पाया आहे. फॅसिस्ट दृष्टिकोनानुसार राष्ट्राची संकल्पना म्हणजे जनतेला त्यांच्या समान पूर्वजांच्या नावाखाली संघटित करणारा, जनतेच्या एकजुटीसाठी नैसर्गिक आधार वाटणारा एकमेव घटक. [[मिलेनारियनवाद|मिलेनारियन]] राष्ट्रीय पुनर्जन्म साध्य करून, राष्ट्र किंवा [[वंश|वंशाचे]]ाचे इतर सर्व बाबींपेक्षा उदात्तीकरण करून आणि एकता, शक्ती आणि शुद्धतेच्या निष्ठेचा प्रसार घडवून फॅसिझम आर्थिक, राजकीय आणि सामाजिक समस्यांना सोडवू पाहतो. युरोपियन फॅसिस्ट चळवळी विशेषतः अशी [[वंशवाद|वंशवादी]] संकल्पना अंगीकारतात की गैरयुरोपियन लोक हे युरोपियनांपेक्षा खालच्या दर्जाचे आहेत. असे असले तरी, युरोपियन फॅसिस्टांचा वंशवादी दृष्टिकोन सरसकट एकसारखा नाही. ऐतिहासिकरीत्या, जरी काही फॅसिस्ट चळवळींनी साम्राज्यविस्तारामध्ये विशेष रुची बाळगली नसली, तरीसुद्धा बर्‍याच फॅसिस्टांनी [[साम्राज्यवाद|साम्राज्यवादाचा]]ाचा प्रसार केला आहे.
=== सर्वंकषसत्तावाद ===
Line ५२ ⟶ ३८:
 
फॅसिझम उदारमतवादी लोकशाहीचा विरोध करतो. तो बहुपक्षीय व्यवस्थेला नकारून एकपक्षीय राज्याचे समर्थन करतो. तरीसुद्धा, त्याने लोकशाहीच्या एका रूपाचे समर्थक असल्याचा दावा केला होता.
 
=== अर्थव्यवस्था ===
 
=== कृती ===
 
=== वयाच्या व लैंगिक भेदाभेदाच्या भूमिका ===
 
=== पुनरुत्थानवाद व आधुनिकतावाद ===
 
== फॅसिझमवर केली जात असलेली टीका ==
Line ७५ ⟶ ५३:
 
=== तत्त्वशून्य संधिसाधूपणा ===
इटॅलियन फॅसिझमच्या अनेक टीकाकारांचे प्रतिपादन आहे की त्यांची बहुतांश विचारधारा ही निव्वळ मुसोलिनीच्या तत्त्वशून्य संधिसाधूपणाचे उप-उत्पादन होती. मुसोलिनी त्याच्या राजकीय भूमिका निव्वळ स्वतःच्या खाजगी आकांक्षांना जपण्यासाठी बदलत असे व लोकांसमोर सांगताना त्यामागे अर्थपूर्ण हेतु असल्याचा आव आणत असे. इटलीचा अमेरिकन दूत रिचर्ड वॉशबर्न चाइल्ड हा मुसोलिनीसोबत काम करत असताना त्याचा मित्र व प्रशंसक बनला, व तो खालील शब्दांमध्ये मुसोलिनीच्या संधिसाधूपणाची संभावना करतो : जे स्वतःचे हितसंबंध टिकवण्यासाठी परिस्थितीनुसार बदलतात, त्या लोकांसाठी "संधिसाधू" ही तिरस्कारवाचक संज्ञा लागू पडते . मुसोलिनीला ज्याप्रकारे मी ओळखतो, त्यावरून तो ह्या अर्थाने संधिसाधू आहे. त्याचा विश्वास होता की मानवजातीने तत्त्वज्ञानाला चिकटून बसण्याऐवजी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्येच बदल घडवायला पाहिजेत, मग त्या तत्त्वज्ञानांवर आणि कार्यक्रमांवर कितीही आशा आणि प्रार्थना अवलंबून अ्सेनात का.
 
=== विचारसरणीशी अप्रामाणिकपणा ===
 
== संदर्भ ==
 
=== टिपा ===
 
=== प्राथमिक स्रोत ===
 
=== दुय्यम स्रोत ===
 
== बाह्य दुवे ==
 
[[वर्ग:राजकीय तत्त्वज्ञान]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले