"आगगाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या पानावरील सगळा मजकूर काढला
खूणपताका: मिवि.-कोरे करणे दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
आगगाडी हे [[रेल्वे वाहतूक|लोखंडी रुळांवरून चालणारे]] आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक [[वाहन]] आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व [[रुळ|रुळांवरून]] धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेणाऱ्या वाहनाला '''रेल्वे'''गाडी म्हणतात. रेल्वेमार्ग हा दोन (क्वचित एक किंवा तीन) समांतर रुळांचा असतो. हे रूळ बहुधा [[स्टील|पोलादी]] असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, काँक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.
 
पूर्वी रेल्वेगाड्या [[कोळसा|कोळशाच्या]] इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला ''आगगाडी'' असे म्हणू लागले. आज बहुतेक रेल्वेगाड्या [[डिझेल]], [[पेट्रोल]] व [[वीज]] इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/आगगाडी" पासून हुडकले