"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
== जीवन ==
विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४१५६३ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
 
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.