"ना.वा. टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वामन टिळक यांच्या वडिलांचे नाव लिहिले
मनकर्णिका यांचे पूर्ण नाव लिहिले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ३६:
 
==जीवन==
वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका नारायण गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या ''स्मृतिचित्रे'' या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. [[नागपूर]] येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना [[बायबल]] वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. [[१० फेब्रुवारी]] [[इ.स. १८९५]] या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
 
[[इ.स. १८९५]] पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ''ख्रिस्तायन'' नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत.