"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.<ref>शिवराज्य, लेखक.इतिहास संशोधक [[मा.म.देशमुख]] पृष्ठ २३</ref>
==पार्श्वभूमी==
[[राजस्थान]]च्या [[चित्तोडगढ]]च्या संग्रामात [[अल्लाउद्दीन खिलजी]]शी लढताना [[राणा लक्ष्मणसिंह]] नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित [[बाबाजीराजे भोसले]] यांच्या घरात [[मालोजीराजे भोसले]] आणि [[उमाबाई भोसले]] यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (मुकुंदनगर भागात हे तारकपूर बस स्टँड ,अहमदनगर जवळ)नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील [[लखुजीराव जाधव]] यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर [[इ.स. १६०५]] मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
 
==अहमदनगरच्या निजामशाहीत==
[[मालोजीराजे भोसले]] आपला भाऊ [[विठोजीराजे भोसले]] इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहजींचे पिता मालोजीराजे यांनी लाखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.