"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ ११:
शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा [[जपानी भाषा|जपानी]] अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.
 
शिरीष पै या ओशोंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी 'प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो' या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे एकूण १४ कथासंग्रह असून कांचनगंगा, खडकचाफा, चैत्रपालवी हे त्यातील काही प्रमुख. शिवाय एकूण २० काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कस्तुरी, [[एकतारी]], एका पावसाळ्यात, चंद्र मावळताना आणि विविध हायकूसंग्रह यांचा त्यांत समावेश आहे. कविता सादर करण्याची त्यांची हातोटी अनोखी होती. त्या नाट्यपूर्ण पद्धतीने कविता सादर करायच्या. त्या काळात शिरीष पै, शांता शेळके, वृंदा लिमये, पद्मा लोकूर, निर्मला देशपांडे या कवयित्रींशिवाय काव्यसंमेलन रंगायचे नाही. या सगळ्याच कवयित्रींमध्ये इतका छान मैत्रीभाव होता. त्यांची अभिनेत्री कुसुम कुलकर्णी यांच्याशीही छान मैत्री होती. या सगळ्यांची वेव्हलेंथ छान जुळायची. त्यामुळे हे मैत्र खास होते. त्यांच्या काव्यवाचन, साहित्यचर्चा अशा मैफली होत. वृंदाबाई, पद्माबाई वृद्ध झाल्या तेव्हा त्या सगळ्यांची काळजी करत असायच्या.
 
शिरीष पै यांनी अनेक पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिल्या आहेत. हे सारे त्या समरसून लिहायच्या. यांतील अनेक प्रस्तावना अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले