"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०८ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| तळटिपा =
}}
'''पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ''<small>म्हणजेच</small>''''' पु.ल.देशपांडे उर्फ भाई(जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून २०००) हे लोकप्रिय [[मराठी]] [[लेखक]], [[नाटककार]], [[नट]], कथाकार व [[पटकथाकार]], [[दिग्दर्शक]] आणि [[संगीत दिग्दर्शक]] होते. त्यांना ''महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व'' असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने '''पु. ल.''' म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ''ऋग्वेदी'' हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि [[सतीश दुभाषी]] हे मामेभाऊ आहेत.{{संदर्भ हवा}}
 
[[गुळाचा गणपती (चित्रपट)|गुळाचा गणपती]], या ''सबकुछ पु. ल.'' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे [[शिक्षक]], लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, [[विनोदकार]], कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, [[चित्रपट]], नभोवाणी, [[दूरचित्रवाणी]] अशा सर्व क्षेत्रांत काम केले.{{संदर्भ हवा}}
 
== जीवन ==
देशपांडे यांचा जन्म [[मुंबई]]तील [[गावदेवी]] या भागात झाला. त्यांचे बालपण [[जोगेश्वरी]] येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी [[पार्ले टिळक विद्यालय|पार्ले टिळक विद्यालयात]] शालेय शिक्षण घेतले आणि नंतर [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात आणि [[सांगली]]च्या [[विलिंग्डन महाविद्यालय, सांगली|विलिंग्डन महाविद्यालयात]] ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली [[सुनीता देशपांडे|सुनीताबाईंशी]] विवाहबद्ध झाले.{{संदर्भ हवा}}
 
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.{{संदर्भ हवा}}