"पोहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
भर
ओळ १३:
===भाजणे===
ही प्रक्रिया कष्टदायक असून त्यास कौशल्याची गरज असते. भाजलेल्या साळी योग्य वेळी भट्टीतून बाहेर काढणे गरजेचे असते.नाहीतर साळीच्या लाह्या तयार होतात. तसेच दाबणे अथवा कांडण्याच्या क्रियेत जास्त तुकडे होतात. कमी भाजले गेल्यासही, तुकडे जास्त पडतात. अचूक नियंत्रण आवश्यक असते.भाजतांना यात सहसा रेती वापरतात.
===दाबणे / ठेचणे===
नंतर अशा भाजलेल्या साळीला उखळात कुटतात, त्याने यातील धानाचे टरफल वेगळे होते. तूस (कोंडा) वेगळा होतो. त्याला चाळले असता पोहे मिळतात.
==मशिन वापरून तयार करन्याची पद्धत==
यामध्ये प्रत्येक प्रक्रियेवर योग्य ते नियंत्रण राखता येते.भिजविलेल्या साळीतील पाण्याचा अंश, भाजतानांचे अचूक तापमान याचा उत्पन्नावर फरक पडतो.
===भाजणे==
पोहे उद्योगात भाजण्याची क्रिया ही मशिनद्वारे केली जाते. त्यासाठी ११० ते १८० अंश सें तपमान आवश्यक असते. त्यासाठी फर्नेसचा वापर कला जातो.भाजतांना साळीतील पाण्याचे प्रमाण ८ ते १२% पर्यंत कमी केले जाते. नंतर यावर मशिनने ते दाबण्याची प्रक्रिया केली जाते.
==दाबणे/पातळ करणे===
नंतर या साळीस दगडाचे रोलर असलेल्या गोलाकार ड्रममध्ये फिरवितात. त्या ड्रमला खाली जाळी असते त्यामुळे कोंडा व टरफले बाहेर पडतात. तरीही कोंडा उरला असल्यास तो वाऱ्याचे झोताने वेगळा करण्यात येतो. नंतर तयार झालेल्या पोह्यास हवाशीर टोपलीत/जाळीत ठेऊन थंड करण्यात येते. व मग त्याचे पॅकिंग करण्यात येते.
 
==उतारा==
१०० किलो साळीचा ५५ ते ७० % उतारा मिळतो. पोह्याची प्रत त्यासाठी वापरलेल्या साळीवर (धानावर) अवलंबून असते. यासाठी तांदळाच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात.
==जास्त उताऱ्यासाठी आवश्यक गोष्टी==
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोहे" पासून हुडकले