"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
 
== वैयक्तिक आयुष्य ==
डॉक्टर अभय बंग आणि [[राणी बंग]] हे दोघेही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते. त्या दोघांनी प्रेमविवाह केला. डॉक्टर राणी बंग यांच्या घरून यास विरोध होता परंतु शेवटी त्यांना लग्नासाठी घरून परवानगी मिळाली. डॉक्टर झाल्यावर [[वर्धा|वर्ध्याजवळच्या]] [[कान्हापूर]] आणि [[महाकाळ]] या गावात त्यांनी वैद्यकीय काम सुरू केले. समाज परिवर्तनाच्या चळवळीचे हत्यार म्हणून ही वैद्यकीय सेवा होती. परंतु सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे तेथे त्यांना जमले नाही. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने मिळून [[चेतना विकास]] ही संस्था सुरू केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरू केले.
 
त्यांना दोन मुले असून मोठ्याचे नाव आनंद आणि छोट्याचे अमृत आहे. विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे. आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले