"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
 
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्लाखान नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेत असली जात असे, युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत, भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढंच रेशन मिळत असे. तर मुस्लीम सणांच्या दिवशी ज्यादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयीसवलती दिल्या जात नाही व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला.
एकदा पाकचे लष्करप्रमुख जनरल टिकाखान यांच्याशी चर्चा करण्यास माणेकशॉ लाहोरला गेले होते. लाहोरच्या गव्हर्नरने माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली होती. भोजनानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी माणेकशॉ यांची भेट घेतली. माणेकशॉ प्रत्येकाशी बोलत-हस्तांदोलन करत पुढे जात होते. अचानक त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याने आपल्या डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायावर ठेवला. माणेकशांनी त्याला तसं करण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला-
“ सर, तुम्ही होतात म्हणून आम्ही जिवंत राहिलो. माझी पाचही मुलं सैन्यात आहेत आणि ते सगळे सध्या तुमचे कैदी आहेत. ते नेहमी मला पत्र लिहून तिथली स्थिती कळवत असतात. तुम्ही त्यांना कुराण दिले आहे, आमचे सैनिक बराकीत राहत असताना तुमच्या जवानांना तंबूत राहावं लागत आहे, हे आम्हाला माहीत आहे. हिंदू वाईट आहेत जर कोणी मला सांगितलं तर मी आता त्यावर विश्वास ठेवणार नाही” {{sfn|दातार, २०१४|पृ. १६१-१६२}}
 
== निवृती नंतर ==