"पोपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
Rahul Dhanorkar (चर्चा)यांची आवृत्ती 1659127 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[चित्र:Rose-ringed Parakeets (Male & Female)- During Foreplay at Hodal I Picture 0034.jpg|thumb|right|250px|पोपटांची जोडी : डावीकडे मादी (मैना), उजवीकडे नर (राघू)]]
'''पोपट''' (शास्त्रीय नाव: ''Psittacula krameri'' , ''सिटाक्युला क्रामेरी'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Rose-ringed Parakeet'', ''रोझ-रिंग्ड पॅराकीट'' ;) ही विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये आढळणारी [[पॅराकीट|पॅराकिटांची]] एक मोठी प्रजाती आहे. नर पोपटाला राघू म्हणतात व मादीला मैना म्हणतात.
[[चित्र:Parrot at hanging rock.jpg|thumb|लाल पोपट]]
Line ११ ⟶ १२:
 
[[वर्ग:पक्षी]]
सिट्टॅसिडी या पक्षिकुलात ज्या पक्ष्यांचा समावेश केलेला आहे त्या सगळ्यांना सर्वसाधारणपणे ‘पोपट’हे नाव दिलेले आहे. या कुलात ८२ वंश आणि त्यांच्या ३१६ जाती दिसून येतात मॅको, लोरी, काकाकुवा, बजरीगार, पॅराकीट, कॉन्यर इत्यादींचा यातच समावेश होतो. पोपट बव्हंशी उष्ण कटिबंधात राहणारे आहेत; पण उपोष्ण आणि थंड प्रदेशातही त्यांचा प्रसार झालेला आहे. त्यांचा उगम ऑस्ट्रेलियन प्रदेशात झाला असावा असे मानतात; तथापि त्यांचे प्रथम सापडलेले काही जीवाश्म (शिळारूप अवशेष) फ्रान्समधील असून ते दीड कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या जितक्या विविध जाती आणि प्रकार आढळतात तितके दुसरीकडे कोठेच आढळत नाहीत.हे पक्षी विविध रंगाचे व आकारमानाचे असतात; पण दिसायला व शरीर-रचनेच्या दृष्टीने ते सारखेच असतात. यांची लांबी १० सेंमी. पासून १०० सेंमी.पर्यंत असते. चोच आखूड, मजबूत वा बाकदार असते. चोचीचा वरचा अर्धा भाग कवटीला जोडलेला असून तो थोडाफार हालविता येतो. मान आखूड व शरीर आटोपशीर असल्यामुळे हा गुबगुबीत किंवा स्थुल दिसतो. यांचे पंख मजबूत व गोलसर असतात. थोड्या अंतरापर्यंत हा अतिशय वेगाने जरी उडू शकत असला, तरी फार दूरवर याला उडता येत नाही. ऑस्ट्रेलियातील भूचर पोपटासारख्या काही पोपटांना तर जवळजवळ उडताच येत नाही. काही पोपटांची शेपटी फार आखूड तर काहींची बरीच लांब असते. पायाच्या चार बोटांपैकी दोन पुढे व दोन मागे असतात आणि त्यांवर बारीक खवले असतात. बहुतेक जातींच्या पोपटांचे रंग भडक असतात. हिरवा हा या पक्षांचा सामान्य रंग होय; पण पुष्कळ जाती बहुरंगी असतात. त्यांच्या शरीराचे निरनिराळे भाग लाल, पिवळे, हिरवे, निळे, काळे इ. रंगांचे असतात. नर व मादी यांचे रंग सारखेच असतात; पण याला काही अपवाद आहेत; उदा; ऑस्ट्रेलियातील इलेक्टस पोपटाच्या नराचा रंग हिरवा तर मादीचा तांबडा असतो. बहुतेक पोपट झाडांवर राहणारे आहेत. त्यांच्या बोटांच्या विशिष्ट व्यवस्थेमुळे ते झाडावर झपाट्याने चढू शकतात किंवा फांद्यांवर हिंडू शकतात. झाडांच्या खोडांवर चढतांना किंवा फांद्यांवर इकडून तिकडे जाताना ते आपल्या चोचीचा देखील उपयोग करतात. पण काही पोपट (उदा. ऑस्ट्रेलियातील पोपटांच्या काही जाती) मुख्यतः जमिनीवरच राहतात; पण जरूर पडेल तेव्हा ते झाडांवर चढून बसू शकतात व आपली घरटीही तेथेच करतात.पोपट मुख्यतः शाकाहारी आहे; पण क्वचित प्रसंगी काही पोपट किडेही खातात. निरनिराळे धान्ये आणि सर्व प्रकारची लहानमोठी फळे हे त्यांचे खाद्य होय. फुलातला मधही ते शोषून घेतात. कठीण कवचीचे फळ, एक पाय वर उचलून त्याच्या बोटात घट्ट पकडून, आपल्या चोचीने फोडतात व वरचे टरफल काढून टाकून आतला गर खातात. सबंध फळ ते कधीच खात नाहीत; फळाचा थोडासा भाग खाऊन बाकीचा टाकून देतात. अशा तऱ्हेने फळबागेची, शेतातील उभ्या पिकाची व झाडांवरील मधझाडांवरीलमध असणाऱ्या फुलांची ते फार नासाडी करतात. ऑस्ट्रेलियातील नेस्टर नोटॅबिलिस या जातीचा पोपट मेंढीच्या पाठीला चोच मारून मेंढीच्या मूत्रपिंडापर्यंत जातो व त्यामुळे मेंढी मरते.
 
झाडाच्या ढोलीत अथवा भोकांत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात. बहुतेक जाती घरट्याकरिता बाहेरच्या कोणत्याही पदार्थाचा उपयोग करीत नाहीत. मादी भोकाच्या आतल्या मोकळ्या जागेत अंडी घालते. काही जाती तर वाळवीच्या वारुळात अंडी घालतात. ऑस्ट्रेलियातील रानटी बजरीगार मात्र ढोलीत किंवा भोकात थोडेसे गवत घालून घरटे बनवितात. अर्जेंटिनातील एका जातीचे हिरवे पोपट प्रजोत्पादनाच्या काळात झाडांवर मोठी सामाईक घरटी बांधतात. वसाहतीच्या स्वरूपाच्या या घरट्यात प्रत्येक जोडप्याकरिता एक स्वतत्र खोली असते. ऑस्ट्रेलियातला एका जातीचा भूचर पोपट जमिनीवरील गवताच्या झुपक्यात घरटे तयार करतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोपट" पासून हुडकले