"शकुंतला रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ८:
वर्‍हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वर्‍हाडवासीयांना आपलेसे केले. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती.
 
या रेल्वेने, [[यवतमाळ]]-[[मूर्तिजापूर]] या ११४<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://economictimes.indiatimes.com/slideshows/infrastructure/shakuntala-railways-indias-only-private-railway-line/british-owned-line/slideshow/55924732.cms|शीर्षक=Shakuntala Railways: India's only private railway line|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=The Economic Times|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१६ जानेवारी २०१९}}</ref> किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंतचे ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १०५ रुपये घेते.
 
अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घेते. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. या एवढ्या वर्षांत या शकुंतलेत काही बदल झाले नाहीत. पूर्वी तीन डबे होते, पुढे ती संख्या पाचवर गेली. १९९४ पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. (ते इंजिन आता पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते.) १५ एप्रिल १९९४ पासून गाडीला डिझेल इंजिन लागले. मात्र, तिच्या वेगात काहीही बदल झालेला नाही.