"पोंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Tiven2240 (चर्चा)यांची आवृत्ती 1592645 परतवली.
खूणपताका: उलटविले
दुवा जोडला.
ओळ १:
 
[[File:Cpongal.jpg|thumb|सामूहिकरीत्या तांदळाची खीर बनवताना]]
'''पोंगल''' (तमिऴ: தைப்பொங்கல்; '''देवनागरी:''' तैप्पोङ्गल्) हा [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. '''‘तमिऴर् तिरुनाळ्’''' म्हणजेच तमिऴभाषिकांचातमिऴ भाषिकांचा शुभदिवस म्हणविला जाणारा हा सण जगात जेथे म्हणून तमिऴभाषिकतमिऴ भाषिक लोक आहेत तेथे, उदा: भारतात प्रामुख्याने [[तमिळनाडु]] राज्यात आणि भारताबाहेर [[श्रीलंका]], [[मलेशिया]], [[सिंगापूर]], यूरोपिययुरोपीय देश, [[उत्तर अमेरिका]], [[दक्षिण आफ्रिका]], [[मॉरिशस]] इत्यादि अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
 
तमिळ संस्कृतीमध्ये सूर्याला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेंव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग ३ दिवस पोंगल हा सण येतो. मकर संक्रमणाची ही घटना सहसा प्रतिवर्षी १४ ते १६ जानेवारीच्या मध्ये पुनरावृत्त होते. ह्या दिवशी पोंगल सणाच्या निमित्ताने सारे शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील लोक सूर्याचे धन्यवाद मानतात. शेतकामामध्ये उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. नववर्षाचे स्वागत म्हणून सूर्यपूजा केली जाते. या काळात [[शिव]]पूजा आणि रुद्राभिषेकही केला जातो. भोगी पोंगल या दिवशी इंद्रपूजा आणि आप्त लोकांसह गोड भोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी घराच्या अंगणात तांदळाची खीर शिजविली जाते आणि तिचा नैवेद्य सूर्य आणि गणपती यांना दाखविला जातो. तिसऱ्या दिवशी गोपूजन केले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोंगल" पासून हुडकले