"साप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. हात व पाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते,त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होऊ शकते. सापांच्या डोक्याच्या कवटी मध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्या पेक्षा जास्त मोठ्या भक्ष देखील गिळू शकतात यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते .
 
== अग्रशीर्ष मजकूर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/साप" पासून हुडकले