"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५९:
महाराष्ट्रा सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दि. २२ एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.
 
सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. २१ एप्रिल रोजी सायं.४ वा मालवण बाजारपेठेतून भव्य शिवप्रेरणायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या ३५० वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला जाणार आहे. दि.२२ एप्रिल ते २४ एप्रिल या तीन दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सांगणाऱ्या कार्यक्रमांचा खजिना इतिहासप्रेमींसहइतिहास प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
 
महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे अडीचशे कलावंतांचा शिवकालीन युद्धकलांचा थरार "शिव शौर्योत्सव" या कार्यक्रमात दररोज स. ९ ते सं. ५ या वेळेत पाहता येणार आहे. दि. २२ एप्रिल रोजी सायं ६.३० वा महोत्सवाच्या औपचारिक उद्‌घाटन सोहळयानंतर केरळ, मणिपूर, प.बंगाल, झारखंड, आसाम, उ.प्रदेश आणि ओडीसा या राज्यातील जवळपास १०० कलावंत भारतातील युद्धकलांचे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यानंतर नाट्यदिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'कोकण रजनी' हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करतील. दि. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी नंदेश उमप हे त्यांच्या साथीदारांसह सादर करीत असलेला "शिवसोहळा" ही ऐतिहासिक सांस्कृतिक मेजवानी हे रसिकांसाठी खास आकर्षण असेल.