"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
}}
 
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६-१२ जानेवारी,२०१९) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक आहेत.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. नव्यानेच सुरू झालेल्या नागपूर आकाशवाणी केंद्रावर सादर केलेले ‘भुतावळ’ नावाचे नाटक हे त्यांचे पहिले दिग्दर्शन. त्यानंतर विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी नाट्यदिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांची निवड झाली.
 
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाटकवेड्या होत्या, त्या नाट्यछटा लिहिणार्‍या आणि बसविणार्‍या होत्या. त्या काळात म्हणजे १९४२/४५ च्या सुमारास त्या नाटकातून काम करायच्या, नाटक बसवायच्या. विदर्भ साहित्य संघासाठी त्यांनी ‘एकच प्याला’ बसविले होते. घरी नाटकाच्या तालमी चालायच्या. प्रधान यांचे वडील अमृतराव प्रधान (त्या वेळच्या अमृत फार्मसीचे मालक) यांचाही पत्‍नीला पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.
 
किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’]]मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले.
 
==अभिनयाची कारकीर्द==