"महाराष्ट्रातील विद्यापीठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्त्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले. सोलापूर विद्यापीठ हे एका जिल्ह्यापुरते मर्यादित आहे २००४ साली स्थापना
 
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अ‍ॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण[[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.