"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो GAJANAN AMBORE (चर्चा) यांनी केलेले बदल Tiven2240 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
खूणपताका: आशय-बदल
ओळ ५:
 
*[[विकिपीडिया:चावडी/वादनिवारण/जुनी चर्चा १| मागील चर्चा]]
 
== सानप संदीप ==
 
{{Stub-एक नागरीक}}
'''संदीप विष्णु सानप''' ([[मे १६]], [[इ.स. १९९२]]; [[बीड]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठी]] [[एक नागरीक]] असून [[भारतीय एक विद्यार्थी|भारतीय एक विद्यार्थी]]
माझे शिक्षण श्री जालिँदर विद्यालय मध्ये झाले.मी कोणी नेता नाही की काही नाही.मला फक्त कविता लिहायला आवडत .तुम्ही म्हणाल येथे फक्त नेत्याची माहीती असते.आपली का नाही देऊ शकत आपण पण हिँन्दुस्थानी आहोत आपल्याला अधिकार आहे.चला देशासाठी काही चागल करुया.
 
::नमस्कार, संदीप
::एक नवागत सदस्य या नात्याने आपल्या शंके करता आपण मदतकेंद्र निवडले असते तर बरे झाले असते, कारण मदत केंद्रावरील उपलब्ध केलेल्या सहाय्यावर बेतून पुढे सहाय्य पानांची रचना करणे बरे पडते. असो आपल्या शंकेचे उत्तर खालील प्रमाणे,
 
::विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही. एक [[ज्ञानकोश]] आहे.ज्ञानकोशात केवळ नेत्यांसाठी नाही, '''[[विपी:उल्लेखनीयता|विश्वकोशीय उल्लेखनीयता]] असलेल्या कोणत्याही 'अबकड' व्यक्ती अथवा गोष्टीची दखल घेतली जाऊ शकते.पण ज्ञानकोशीय विश्वासार्हता पाळण्याच्या दृष्टीने येथे काही संकेतांचे पालन केले जाते.
 
*(काही अपवाद वगळता) सहसा इतर जगाने इतर माध्यमातून एखाद्या व्यक्ती/घटना/गोष्टीची दखल घेऊन झाल्याच्या नंतर त्यातील सुसंबद्ध ज्ञानकोशीय माहिती तेवढी संदर्भासहीत ज्ञानकोश स्विकारत असतात.कोणत्याही विषय नसण्याचे बंधन नाही म्हणून विकिपीडिया मुक्त म्हणविला जातो परंतु ज्ञानकोशीय मर्यादांच्या परिघातच.या बद्दल बरेच संकेत आहेत .आपण सावकाश पणे येथील सर्व संकेतांशी अभ्यस्त होउ शकता.
 
*विकिपीडियावर माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वत:चे अथवा स्वत:बद्दल लेखन करणे करवून घेणे अभिप्रेत नसते.
 
* आपल्या कविता आणि ज्ञानकोशाच्या परिघा बाहेरील इतर गोष्टी जसे की देशा साठी वगैरे करण्यास इंटरनेटवर इतरत्र बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या कडून देशा साठी काही चांगले कार्य अवश्य होउ द्या. आपण नेतेच झाले पाहिजे असे नाही कोणत्याही क्षेत्रात नावारूपाला या.इतर लोकांनी स्वत:हून आपली ज्ञानकोशात दखल घ्यावी एवढे मोठे व्हा.त्या करिता आपणास शूभेच्छा.
 
*नावारुपाला आणेल हा उद्देश खूप आवश्यक नसेल तर,वर नमुद केल्या प्रमाणे स्वत: विषयीच्या माहितीस खूपसे महत्व देण्याचे टाळले तर आपण विकिपीडियावरील ज्ञानकोशात ज्ञानकोशीय माहितीची भर घालणे हे सुद्धा चांगले कार्यच आहे.हेही लक्षात घेता येइल
 
*मराठी विकिपीडियावरील वावरा करीता येथील सहाय्य पानांचे वाचन करा. १) [[विपी:परिचय]] , २)[[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]], ३) [[विकिपीडिया:मर्यादा#.विश्वकोश संकल्पना]], ४) [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]] हे सुद्धा अवश्य पहावे.
 
::पुनश्च आपले मराठी विकिपीडियात स्वागत.
 
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ११:३४, २४ मे २०१३ (IST)
 
== लता – एक संगीताभ्यास – २ ==
{{विषयांतर |मजकूर = ................................... ................
मागील लेखात आपण, लताच्या ३ गाण्याच्या अनुषंगाने गायकीचे काही पैलू बघितले. १९६० पर्यंत असे सर्वसाधारण अनुमान काढता येईल, लता, नैसर्गिक गोडव्याच्या आधारे गात होती परंतु असे नव्हे की जिथे गायकीची परीक्षा होईल, अशा रचना देखील तितक्याच ताकदीने गायल्या नाहीत!! मागील लेखातील, सज्जादने संगीतबद्ध केलेले “वो तो चले ऐ दिल” हे गाणे या संदर्भात समर्पक ठरावे. परंतु, आवाजातील कोवळीक, मृदुपणा, हलक्या ताना हेच तिच्या गायकीचे प्रधान अंग होते,निदानपक्षी १९५५ पर्यंततरी हेच म्हणावे लागेल. अर्थात, जर का सुगम संगीताचा प्रवास थोडा जाणीवपूर्वक तपासाला तर हेच दिसेल, रचनांचे बंध,वाद्यमेळ आणि त्यानुसार आधारलेली गायकी, यात, दर १० ते १५ वर्षांनी बदल होत गेलेला आहे. मुळात, वाद्यमेळ हि संकल्पना भारतीय संगीतात, पाश्चात्य संगीतातून “आयात” केलेली आहे. आपल्याकडे पहिल्यापासून, कंठसंगीत हेच संगीताच्या अविष्काराचे प्रधान साधन मानले गेले असल्याने, वाद्यसंगीत म्हणजे गायनाला पूरक अशी साथ, ह्या विचाराचाच प्रभाव होता आणि तो चित्रपट गाण्याच्या सुरवातीच्या काळात अधिक दिसून येत होता, यात काहीच नवल वाटू नये!! अर्थात, थोडा विचार केला तर असे आढळून येईल, पाश्चात्य संगीतात देखील, जरी वाद्य संगीत आधारभूत असले तरी वाद्यमेळ आविष्कृत रचना, या आधुनिक काळातच तयार झालेल्या आहेत, उदाहरणार्थ बीथोवन, मोझार्ट, बाख यांच्या रचना काळजीपूर्वक ऐकल्यास,माझे म्हणणे पटावे. जसजसे, आपला संपर्क पाश्चात्य संगीताशी घनिष्ट व्हायला लागला, त्यानुसार आपल्याकडे सुगम संगीतात वाद्यमेळ हि कल्पना रुजायला लागली. याचाच आधुनिक अवतार, राहुल देव बर्मन याच्या रचनेतून स्पष्ट दिसून येतो.
 
असो, परत मूळ विषयाकडे वळायचे झाल्यास, लताच्या गायकीकडे थोडे विचक्षण नजरेतून पहिले तर असे सहज दिसून येईल, मागील शतकातील, साठोत्तरी गाण्यात, तिच्या आवाजात भरीवपणा अधिक आला, ताना अधिक साक्षेपी, मुरकी जर अवघड होत गेली. याचाच परिपाक, “सुनो सजना पपिहे रे” या गाण्यातून स्पष्ट होतो.
“सुनो सजना पपिहे रे” : या गाण्याची सुरवातच मुळी तार स्वरात होते!! ज्यांना, गाण्याचे आणि स्वरांचे थोडेफार ज्ञान आहे, त्यांना हा आलाप किती कठीण आहे,याची कल्पना येऊ शकते, अर्थात, नुसते ऐकले तरी, अवाक व्हावे, अशा रीतीने सुरवातीचा आलाप आहे. अर्थात, आलापाच्या आधी संपूर्ण तार सप्तकात व्हायोलीनची गत त्या रचनेचा अवघडपणा दृग्गोचर करतो. ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीत “आये दिन बहार के” इथे “बहार” या शब्दावर जे स्वरांचे आवर्तन आहे, ते केवळ असामान्य आहे. इथे बहार शब्दातील “हा” हे अक्षर उच्चारताना, जी स्वरांची “लगट” आहे, ती ऐकण्यासारखी आहे. इथे लताची स्वरांवरील हुकुमत,लयीच्या अंगाने कशी विस्तारली आहे, हे लक्षात येते. पूर्वीच्या गाण्यात, शब्दोच्चार कसे असावेत, हे गायकीचे वैशिष्ट्य आपण बघितले होते, तेच वैशिष्ट्य इथे आणखी वेगळ्या अंगाने विस्तारल्याचे समजून येते. अर्थात, गाण्याची रचनाच अशी आहे की इथे गायकीला आव्हान मिळावे!! या गाण्यात, चालीची वळणे विलक्षण अवघड होतात पण अशाच गाण्यात, लताची गायकी ज्याला “खासियत” म्हणता येईल, अशी आपल्यासमोर येते. पहिल्या अंतऱ्यात चाल, द्रुत लयीत जाते तशी साथीचा तबला “गत” वाढवतो पण त्याच लयीत, लता आपली गायकी संयमित ठेऊन, परत समेवर “ठेहराव” कशी घेते,हे जरूर ऐकण्यासारखे आहे. जर बारकाईने ऐकले तर कळेल, लता गाताना कधीच एखादा “सुटा” किंवा “स्वतंत्र” स्वर घेत नसून, त्या सुराबरोबर बाजूचे सूर अलगद गळ्यातून काढते आणि समेवर येउन विसावते!! हे जे बाजूचे स्वर असतात,त्यालाच शास्त्रीय परिभाषेत “श्रुती” म्हणतात आणि ह्याच श्रुती लताच्या गायकीतून फार अप्रतिमरीत्या उमटतात!! गमतीचा भाग असा आहे, स्वरांची जी असामान्य “कामगत” आहे, ती इतक्या सहजपणे गळ्यातून बाहेर येते की ऐकताना थक्क व्हावे!! लताची खासियत अशी आहे, सर्व साधारण गायक, हरकत किंवा मुरकी बरेचवेळा ओळ संपल्यावर घेतात किंवा शब्द संपविताना घेतात परंतु लता, रचनेच्या अंगाने क्वचित शब्दाचे दोन भाग करते आणि तिथे एखादी हरकत घेते!! इथे, ह्या गाण्यात, दुसऱ्या कडव्याच्या शेवटी, “बेचैन कर ना देना” हि ओळ ऐकावी. इथे “देना” हा शब्द उच्चारताना “दे” या अक्षरानंतर वजनदार हरकत घेतली आहे (क्षणभराचीच आहे तरीही!!) आणि ती स्वरपुंज “ना” या शब्दावर स्थिरावला आहे!! फार अवघड गायकी आहे!! इथे लय कुठेच वेगळी होत नाही पण लय, रचनेच्या अंगाने अशी फिरवली जाते, खरच मती गुंग व्हावी!! अशा गायकीत थोडासा का होईना प्रतिभेचा “अंश” दिसतो. इथे मी “प्रतिभा” आणि ”अंश” हे शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत,कारण हल्ली हे शब्द इतक्या सवंगरीतीने वापरले जातात की त्यातला मूळ अर्थच निघून गेला आहे!!
एक बाब इथे स्पष्ट करतो, इथे मी गाण्याचे विश्लेषण करीत नसून लताच्या गायकीला आधार, म्हणून हि गाणी घेतली आहेत.
“बैय्या ना धरो” : सुगम संगीतात वास्तविक, रागदारीचा उल्लेख करू नये, असे मला मनापासून वाटते,कारण रागाचे नाव आले की लगेच त्या रागाच्या अनुषंगाने गाण्याची चिरफाड केली जाते!! सुगम संगीतात, राग हा आधार असतो, तो केवळ त्या सुरांच्या अनुषंगाने!! बाकी, रचनेचा विस्तार हा संगीतकार आणि गायक, त्यांच्या बुद्धीचा परिपाक असतो. प्रस्तुत गाणे जरी चारुकेशी या काहीशा अनवट रागावर आधारलेले असले तरी, रागविस्तार आणि रचना यात महदअंतर आहे!! अर्थात, हि संगीतकाराची मर्दुमकी!! गाण्याची चाल, संपूर्णपणे रागाची सावली असावी की केवळ आधाराला सूर घ्यावेत, हा वेगळ्या वादाचा विषय आहे. गाणे अतिशय संथ लयीत सुरु होते. सतार आणि तबला हीच प्रमुख वाद्ये, अर्थात पार्श्वभागी व्हायोलीन अत्यंत अस्पष्ट आहे. इथे मी जरा विस्ताराने सांगितले ते अशासाठी, साथीला मोजकी वाद्ये असली आणि चाल “गायकी” अंगाची असेल तर लताचा गळा कसा खुलतो, हे दर्शविण्यासाठी!! मघाशी मी “गायकी” अंग हा शब्द वापरला, त्याचा नेमका अर्थ विशद करतो. भारतीय संगीतात, गायन हेच नेहमी प्रधान अंग राहिले आहे. त्यामुळे ज्या गाण्यात (सुगम संगीतातील), चालीमध्ये “गायनाला” अवसर आहे, त्याला गायकी अंग म्हणतात. अर्थात परत, रागदारी गायन आणि सुगम संगीताचे गायन, हे दोन्ही भिन्न विषय आहेत.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे लयीची वेगवेगळी अंगे, जी रचनेत अनुस्यूत आहेत, ती लताने ज्या प्रकारे गळ्यातून, दाखवली आहेत, त्याचा आस्वाद घेणे. थोड्याशा खर्ज स्वराने सुरवात करून, मध्य सप्तकात प्रवेश केला आहे. आता इथे गंमत मांडायची आहे. निसर्गत: खर्ज स्वर पुरुषी गळ्याला तर तार स्वर स्त्री गळ्याला सहज खुलतात!! त्यातून लताच्या स्वराची जात पातळ,त्यामुळे तार स्वरांची पट्टी गाठणे सहज शक्य. गाणे हे १९७० च्या दशकातील आहे, यावेळेस लताचा आवाज अधिक परिपक्व झालेला, तानांवरील पकड अधिक घोटीव झालेली दिसून येते. त्यामुळे, गाण्याच्या सुरवातीचा खर्ज अधिक “लाघवी” झालेला दिसतो. तसे गाणे पूर्णपणे मध्यलयीतच चालते परंतु, शब्दोच्चार आणि त्यासोबत सुरांचे “कण”, यातून सांगीतिक सौंदर्यनिर्मिती, हा लताच्या गायकीचा नवा अवतार इथे दिसतो. चालीतील संयत प्रेम भावना, शब्दांचे औचित्य कुठेही न ढळता, गळ्यातून ज्या प्रकारे मार्दव दाखवले आहे, ते खरतर शब्दातून मांडणे फार अवघड आहे. गाणे ऐकणे, हा एक अनिर्वचनीय अनुभव आहे. चाळीत, एक,दोन ठिकाणी, स्वर वरच्या सप्तकात जातो पण तिथेही स्वर “ताणला” असे घडत नाही. स्वरांची ही जी कठिणावस्था आहे, तिचे गळ्यातून प्रकटीकरण सहजप्रवृत्तीने दर्शवायचे, हे सोपे काम नाही. मघाशी मी “गायकी” हा शब्द वापरला, तो या संदर्भातदेखील योजता येईल.
“रैना बीती जाये : काही गाणीच अशी असतात, त्याच्या पहिल्याच सुरात गाण्याचे चलन आणि वळण समजते!! गाणे साध्या गळ्याला अजिबात पेलणारे नाही, याची खुणगाठ मनाशी बाधावी लागते. या गाण्याचा सुरवातीचा आलाप इतका गोड आणि अवघड आहे की त्या स्वरपुंजापुढे नतमस्तक व्हावे!! गुजरी तोडी सारख्या अनवट रागातली चाल!! सारंगीच्या अप्रतिम सुरात लताचा टिपेचा सूर मिसळला गेल्यावर जे स्वरसौंदर्य ऐकायला मिळते त्याला दुसरी तुलना नाही. मागील लेखात, एक वैशिष्ट्य सांगताना, श्वासावरील असामान्य नियंत्रण, याचा उल्लेख केला होता. गाण्यात जेंव्हा मोजकीच वाद्ये असतात तिथे श्वासावरील नियंत्रण, या बाबीला फार महत्व येते. “शाम ना आये” या ओळीवरील कामगत ऐका. वास्तविक लयीच्या बंधात शब्दरचना थोडी तोकडी पडते परंतु “आये” मधील “आ” नंतर जी हरकत आहे, काही सेकंद (च) आहे पण जीवघेणी आहे!! गळा लयीशी परिपक्व झाला आहे, याची इथे साक्ष आहे. लताची गायकी तुकड्यातुकड्यातून खुलत जाते. इथे पूर्ण सप्तकी तान फारशी आढळत नाही, त्याची तशी गरज नसते परंतु स्वरांचा अर्धस्पर्श, त्या शब्दातील मुग्ध भाव नेमकेपणी दाखवतात.
स्वर असा घ्यायचा, तो स्वर गळ्यातून निघत असताना, लयीत विसर्जित करायचा!! हेच कुणाला फारसे जमत नाही!! शब्दावर जोर तर द्यायचा पण त्यातील अनावश्यक “जोर” वगळून, “खटक्याच्या” सहाय्याने आशय वृद्धिंगत करायचा आणि लयीचा वेगळा बंध दर्शवायचा!! बरे असे नव्हे, लय एकमार्गी सरळ रेषेत चाललेली आहे, ओळीच्या मध्येच, क्वचित शब्दांच्या मध्ये लय बदलते आणि चाल कठीण होऊन बसते. हे “काठीण्य” स्वरांतून मृदू करून दाखविण्याची असामान्य करामत लता या गाण्यात दाखवते. त्यामुळेच हि गायकी ऐकायला सोपी वाटते पण प्रत्यक्ष गायला घेतली की त्यातले “खाचखळगे” दिसायला लागतात!! ह्या गाण्यात बरेच ठिकाणी असे अनुभव अनुभवायला मिळतात. अशा वेळेस, कुणाला दाद द्यायची आणि किती दाद द्यायची, अशी मनाची कुतरओढ होते.
अर्थात, इथे मी केवळ ६ गाण्यांचाच प्रपंच मांडला आहे. मी असा अजिबात दावा करणार नाही, यातून लताच्या गायकीचे नेमके सार मांडू शकलो आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, हे वाचून इतरेजनांना इतर, इथे दुर्लक्षित झालेले पैलू मांडावेत. लताची गायकी, केवळ याच ६ गाण्यापुरती सीमित आहे, यासारखा दुसरा खूळचटपणा दुसरा नसावा!!
पुढील प्रकरणात, लताच्या गायकीत नेमके काय असामान्य आहे आणि कुठे कमतरता आहे (शास्त्रानुरूप कुणीही कलाकार कधीच पूर्णत्वास पोहोचत नाही!!) याची छाननी करण्याचा प्रयत्न करून, समारोप करणार आहे.
|सदस्य = अनिल गोविलकर
|नोंद_करणारा = Mahitgar
}}
== लता – एक संगीताभ्यास – भाग ३ ==
 
{{विषयांतर |मजकूर = ................................... ................
 
लताबद्दल आत्तापर्यंत खरेतर असंख्य लेख लिहून झाले आहेत, त्यामुळे आता नवीन काय लिहायचे हा प्रश्नच आहे. इथे, मी लता – गायिका, या दृष्टीकोनातून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. लताविषयी लेख वाचताना, काही मुद्दे माझ्या लक्षात आले. वास्तविक, हि गायिका इतकी प्रसिध्द आहे की तिला कसलेच खाजगी आयुष्य उरलेले नाही. त्यामुळे, बऱ्याचशा लेखात, लता मंगेशकर, व्यक्ती म्हणून कशी आहे, याबद्दलच लिहिलेले आढळते. उदाहरणार्थ, “लता पांढऱ्या साडीत किती सुंदर दिसते” असले वाचतानाच डोळे पांढरे करणारे वाक्य हमखास वाचायला मिळते किंवा “लता किती गोड बोलते”, “फोनवर किती सुरेख बोलते” अशी वर्णने वाचायला मिळतात!! एकदा की तुम्ही सार्वजनिक झालात की मग अशा लेखांना उदंड प्रतिसाद मिळतो. परंतु जरा विचार केला तर, या गोष्टींचा तिच्या संगीताशी काय संबंध? मुळात, लता ही गायिका म्हणून प्रसिध्द आहे, तेंव्हा त्यानुरूप लेख लिहिणे क्रमप्राप्त ठरते. असे नव्हे की तिच्या बाकीच्या गुणांची माहिती मिळू नये परंतु, गणपती आहे म्हणून मखराला शोभा आहे, याचा विसर पडतो!! कै. अशोक रानडे किंवा राजू भारतन (आणि काही अपवाद लेखक असतील!!) वगळता, तिच्या गायनाची चिकित्सा अभावानेच आढळते, किंबहुना, आपल्याकडे, सुगम संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन बव्हंशी मनोरंजनात्मक असल्याने काहीही बौद्धिक लिहिले जात नाही आणि हि फार मोठी उणीव आहे. याचा अर्थ असा नव्हे, इथे मी बरेच काही बौद्धिक लिहिणार आहे परंतु त्यादृष्टीने प्रयत्न मात्र नक्कीच करणार आहे., आणि त्याच दृष्टीने, मी, मागील २ लेखांत लताची गायकी आणि काळानुरूप घडत गेलेला बदल, याविषयी चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला.
लता जेंव्हा चित्रपट सृष्टीत आली,तेंव्हा चित्रपट संगीतात फार मोठे मन्वंतर घडत होते, नाट्यसृष्टीला घसरण प्राप्त होत होती. असे असले तरी चित्रपट संगीतावर, पारशी आणि मराठी थियेटरचा फार मोठा प्रभाव होता आणि त्यावेळच्या रचना ऐकल्यावर, आपल्याला कल्पना करता येते. मुळात, चित्रपटात गाणे, यालाच फारशी प्रतिष्ठा नव्हती!! याला, पहिला धक्का दिला, प्रथम सैगल आणि नंतर नूरजहान,यांनी!! चित्रपट संगीतात गाण्यासाठी गायनाची जरुरी असते,याची जाणीव या दोन गायकांनी करून दिली. अर्थात, लतावर नूरजहानचा प्रभाव असणे, क्रमप्राप्तच होते. अगदी, “आयेगा आनेवाला” हे गाणे जरी विचारात घेतले तरी हा मुद्दा स्पष्ट व्हावा. लताचे खरे कर्तृत्व असे की ,ज्या गायकीची कास सुरवातीला धरली, त्या प्रभावातून, फार लवकर बाहेर पडली आणि स्वत:ची गायकी सिध्द केली!! आता, स्वत:ची गायकी म्हणजे तिने नक्की काय केले? ती गायकी कितपत “अभिजात” आहे? तिच्या गायकीचा अजूनही प्रभाव आहे म्हणजे नक्की काय आहे? अशा काही प्रश्नांतून आपण, गायकीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एक बाब तर अवश्यमेव मान्य करायलाच हवी आणि ती म्हणजे, जवळपास ५० पेक्षा अधिक वर्षे जनमानसावर अधिराज्य आणि तेदेखील अव्याहतपणे गाजविणे, ही सहज जमणारी बाब नव्हे. भारतीय संगीतात असे फार थोडे कलाकार आहेत, त्यांना, इतकी वर्षे अधिराज्य गाजवता आले आहे आणि ते देखील उत्तरोत्तर वाढत्या प्रमाणात!! चित्रपटात दृश्य, श्राव्य संवेदना आणि संविद एकत्र वावरत असतात आणि या तिन्ही घटकांना बाजूला सारणे, म्हणजे पार्श्वगायन!! इथे लताचे एक वैशिष्ट्य लगेच ध्यानात येते. लताने, गाणे गाताना, त्याला स्वत:चे असे “अंग” दिले!! थोडक्यात, आविष्काराच्या अनेक शक्यता ध्यानात घेता, वास्तववाद, प्रयोगशीलता याबाबत सांगीत सौंदर्याचा अनुनय करताना, एक वेगळी प्रणाली निर्माण केली!!
लताच्या आवाजाचा तारता-पल्ला अतिशय विस्तृत आहे. त्यामुळे लयीच्या सर्व दिशांनी तिला, चपलगती चलन सहज शक्य आहे. याचाच वेगळा अर्थ, सगळ्या सप्तकात तिचा गळा सहज फिरतो. असे असले तरी, निसर्गत: स्त्री आवाज आणि पुरुष आवाज, यांच्यात काही महत्वाचे फरक बघावे लागतील . स्त्रीचा गळा साधारणपणे पातळ असतो आणि त्यादृष्टीने, तार स्वरात स्त्रीचा गळा जितका सहज जातो तितका पुरुषी गळा जात नाही!! याचाच उलट भाग असा, पुरुषी गळ्यात “ढालेपण” नैसर्गिक असल्याने, खर्ज स्वर ज्या प्रमाणात पुरुषी गळ्यात सहज येतात, तितक्या प्रमाणात स्त्री गळा जाऊ शकत नाही!! वास्तविक पाहता, ध्वनिशास्त्र ताडून पाहिले असता असे आढळते, जर का गळ्यात “खर्ज” स्वर जितका अंतर्मुखरीत्या लावता येईल तितक्या सहजपणे “तार” स्वर सहज घेत येणे शक्य आहे. असे असले तरी, स्त्री गळ्याला “तार” स्वर जितका सहज शक्य आहे, तितका पुरुषी गळ्याला नाही, हे सर्वमान्य सत्य आहे.
आता, याच विचाराचा दुसरा अर्थ असा काढता येईल, लताच्या गळ्यातून तितका “असामान्य” खर्ज येत नाही!! मुळात स्त्री स्वर त्यातून लताचा गळा अतिशय पातळ, त्यामुळे शास्त्रानुरूप जितका “खोल” खर्ज ऐकायला मिळावयास हवा, तितका लताच्या गळ्यातून ऐकायला मिळत नाही!! इथे लताच्या गायकीचे “न्यूनत्व” दर्शवायचे नसून, निसर्गक्रम कसा असतो आणि अखेर शास्त्र नेहमीच महत्वाचे आणि कलाकार त्याच दृष्टीने न्याहाळायचा, इतकेच माझे म्हणणे आहे.
लताच्या आवाजातील आणखी प्रमुख जाणवणारे वैशिष्ट्य – प्रासादिकता!! रसिकांपर्यंत पोहोचणारे गाणे, हे नेहमी एका चाळणीतून गाळून येत असते!! त्यामुळे चाळणी काय गुणवत्तेची आहे, ते इथे महत्वाचे ठरते. याच प्रसादगुणांमुळे लताच्या आवाजातून जे गाणे ऐकायला मिळते, ते बव्हंशी अतिशय विशुध्द स्वरुपात मिळते, तिथे संगीत अपभ्रष्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. संगीतकारांना याचा गुणाचा अधिक विशेष वाटत असतो. त्यांच्या ज्या रचना आहेत, त्यातील नेमकी गुणग्राहकता, लताच्या गळ्यातून तंतोतंतपणे रसिकांपर्यंत पोहोचणार, याची रचनाकारांना खात्रीच असते.
आपल्या संगीत शास्त्रात “शारीर” हे एक वैशिष्ट्य मानले आहे. सादर होणाऱ्या रचनेच्या (इथे रचना म्हणजे रागदारी तसेच सुगम संगीत, असे दोन्ही आहे!!) योग्य त्या भावनिक गाभ्याशी थेट पोहोचण्याची आवाजाची क्षमता, या गुणाने शक्य होते. संगीताचा गाभा आणि त्याचा आविष्कार यांच्या दरम्यानच्या प्रक्रिया इथे बाजूला सरल्या जातात कारण गायिकेचा आवाज अगदी सहज भावनेपर्यंत पोहोचतो!!
दुसरे अनन्यसाधारण वैशिष्ट्य सांगता येते – लालित्य!! अनेकदा सर्व कळतं किंवा सौंदर्यात्म प्रयत्नांचे लक्षण म्हणून लालित्याचा उल्लेख केला जातो. कोणतीही कला किंवा शैली असो, तिथे याच शक्ती कार्यरत असतात. त्यामुळे, कुठल्याही कृतीचे, कलाकृतीत रुपांतर होते, तिथे लालित्य अवश्यमेव आढळतेच!! व्यापक कलानुभव आणि सांस्कृतिक अर्थपूर्णता, या दृष्टीने, लताच्या गळ्यातील “लालित्य” हा अवाक करणारा अनुभव आहे.
 
आता इथे आणखी एका विवादास्पद मुद्द्याचा उहापोह करून, मी लेख संपवीत आहे. कलेची इतिश्री हि नेहमी सर्जकतेच्या पातळीवर बघणे जरुरीचे असते. लताच्या बाबतीत विचार करताना, तिच्या गायकीत सर्जनशीलता किती आहे? हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. म्हणजे बघा, चित्रपटात, प्रसंग कुणीतरी लिहिलेला असतो, त्यावर कुणीतरी अभिनय करणार असतो, त्यापुढे कवीचे शब्द येतात, त्यानंतर संगीतकाराची रचना अस्तित्वात येते!! म्हणजे, नकाशा हाताशी असतो!! लता फक्त त्या नकाशातील रस्त्यातून मार्ग आक्रमित असते!! म्हणजे ज्याला सर्जनशीलता म्हणता येईल, ती इथे कितपत योग्य ठरते? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कारण, हाच प्रश्न अभिनेत्याबाबत विचारला जाऊ शकतो!! प्रसंग लेखकाने निर्माण केलेला, संवाद लेखकाचे, प्रसंगाची जुळणी दिग्दर्शकाची, सोबत संगीताची साथ परिणामकारकता वाढवीत असते, तेंव्हा अभिनय कला देखील कितपत सर्जकतेच्या पातळीवर सिद्ध होते?
हातातील नकाशातून मार्ग आक्रमित इप्सित स्थळाशी पोहोचणे काही सहज शक्य नाही. वाटेत कितीतरी खाचखळगे पार करावे लागतात आणि ते खळगे, प्रत्यक्ष प्रवासाला आरंभ केल्याशिवाय समजणारे नसतात. म्हणजे त्या दृष्टीने सर्जकता जरूर आहे पण तिची प्रत कुठल्या पातळीवरील आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने, लताची गायकी, हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर उभे करते, हे निश्चित!! म्हणजे परत प्रश्न असा, हे आव्हान पेलावयाचे कसे?
 
|सदस्य = अनिल गोविलकर
|नोंद_करणारा = Mahitgar
}}
== टाकणकार समाजातील एक जूनी संस्कृती ==
 
{{विषयांतर |मजकूर = ................................... ................
वाघ्ररी मिञांनो,
जय वळेखण...!
 
आपल्या समाजातील एक जूनी संस्कृती आहे, पंरतू कालानतराने अशा संस्कृतीवर दडपण घातले आहे.
मी तुम्हाला सांगु इच्छितो की, आपल्या समाजात जेव्हा मुलीचे लग्न पक्के ठरल्यावर मुलीच्या लग्नाचा मेंढा देण्याची आपली पांरपारीक पद्धत होती. हा एक आपला संस्कृतिचा भाग आहे.
पंरतू आज ती पद्धत राहिली नाही. या पद्धतीला मोड होयला काही जास्त दिवस झाले नाही. हि पद्धत तर आपल्या आजोबांच्या काळापर्यत होती...
 
आणि आता एक सांगा की मुलीच्या लग्न ठरल्यावर मेँढा का मारत असत?
(या पद्धत ला आपल्या भाषेत काश्या कुवारी चा मेँढा असे म्हणत)
|सदस्य = Satishgmalve
|नोंद_करणारा = Mahitgar
}}
 
== नक्की ज्योतिष शास्र काय आहे? ==
 
{{विषयांतर |मजकूर = ................................... ................
//श्री//
नमस्कार !
मागच्या लेखात आपण फल ज्योतिष शास्राचा इतिहास बघितला कि, साधारणपणे फल ज्योतिष शास्राचे पाळेमुळे आपणास इ.स.पूर्व ४५०० वर्ष मागे नेतात अगदी रामायण महाभारत यांच्या कालखंडात त्याच बरोबर इजिप्त,ग्रीक ,जर्मनी,आणि संपूर्ण युरोप आपण फिरून आलो.आता प्रश्न पडतो की असा बराच मोठा इतिहास असलेले आणि सध्या प्रत्येकाच्या तोंडी असलेले हे असे फल ज्योतिष शास्र आहे तरी काय ? आणि यात नक्की किती तथ्य आहे? आज आपण याच दोन प्रश्नान्नाचा विचार करणार आहोत.
वास्तविक पाहता येवढा प्रदीर्घ इतिहासाने समृद्ध अश्या या फल ज्योतिष शास्रा बद्दल अशी शंका घेण योग्य नाही पण विवेकानंदांच्या म्हणण्या नुसार “जो पर्यंत एखादी गोष्ट अनुभवाच्या किंवा बुद्धीच्या पटलावर घासून तीला बुद्धी स्वीकारत नाही तो पर्यंत ती मान्य करू नका” हे अगदी योग्य आहे म्हणूनच हा लेख प्रपंच करीत आहे.
प्रथमता पहिला प्रश्नाचा विचार करू.
फल ज्योतिष शास्र नक्की आहे तरी काय ?
खर तर या फल ज्योतिष शास्राची गंमत मानाशास्रा (phycology) प्रमाणे आहे. ती अशी कि ज्या प्रमाणे मानाशास्राचे सिद्धांत हे दृढ असूनही ते व्यक्ती परत्वे लवचिक होतात आणि गणित किंवा विज्ञाना प्रमाणे २+२=४ अस मांडता येत नाही आणि त्यामुळेच वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण आवघड होवून जात अगदी हेच फल ज्योतिष शास्राला हि लागू होत कारण यात सिद्धांत जरी असले तरी ते कुंडली परत्वे लवचिक होता आणि मग २+२ कधी ४ कधी ५ तर कधी ० होतात. आणि हीच फल ज्योतिष शास्राची कमकुवत बाजू आहे तर फल ज्योतिष शास्राच्या अभ्यासकांसाठी आकर्षानाचे कारण..............
मानाशास्राप्रमाणे फल ज्योतिष शास्र हि फक्त आणि फक्त अनुभवण्याच शास्र आहे. ते गणित किंवा विज्ञाना प्रमाणे संपूर्णत: सिद्ध करतायेत नाही. याचा अर्थ हा नाही कि फल ज्योतिष शास्र हे खोटे किंवा अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या आरोपां प्रमाणे स्वप्न विकण्याचा व्यवसाय आहे. आजही जगात अनेक असे शास्र आहेत कि जे विज्ञाना प्रमाणे सिद्ध करता येत नाहो पण जगात त्यांना नक्कीच एक शास्र म्हणून मान्यता प्राप्त आहे. मग ती फल ज्योतिष शास्राला का लागू होवू नये????
एखाद्या भोंदू ज्योतिष्याकडे जायचं आणि मग त्याने सांगितल्या प्रमाणे नाही झाल किंवा त्याने सुचवल्या प्रमाणे पूजा {कर्मकांड } करूनही फरक नाही पडला किंवा काम नाही झाल म्हणजे फल ज्योतिष शास्र खोट ठरत नाही. तर ती त्या ज्योतिष्याची चुकी असते शास्राची नाही.......
समजा आपण एखाद्या वैद्या (drDr.) कडे गेलो आणि त्याने आपणास तपासले,गोळ्या दिल्या आपण त्या घेतो परंतु त्या घेवूनही आपणास कोणताही फरक नाही पडला तर आपण वैद्यकीय शास्रालां खोट म्हणत नाही किंवा दोषही देत नाही तर मग आपण हीच गोष्ट फल ज्योतिष शास्राला का लागू करत नाही हा आपण दुजा भाव का ठेवतो ?????
मी हे सगळ का लिहितोय असा प्रश्न पडला असेल ना??? कारण एवढच कि आपले सर्व पूर्व ग्रह दूर व्हावे आणि निपक्षपातिपणे आपण या लेखाकडे पाहू शकाल.आणि माझे सर्व मुद्दे समजून घेण्यासाठी जी पारदर्शक नजर मला हवी आहे ती आपणास प्राप्त व्हावी........
तर आपण कुठे होतो तर हा....... नक्की फल ज्योतिष शास्र आहे तरी काय ???
खर तर या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हेच खूप मोठे आव्हान अआहे कारण वर म्हनाल्याप्रमाने फल ज्योतिष शास्र हे संपूर्णता अनुभवण्याचे शास्र आहे. तरी सांगायचं झाल तर............
मानवाला नेहमीच भविष्याची ओढ लागलेली असते तो वर्तमानात राहून सतत भविष्याची चिंता वाहत असतो.आणि ह्या चिंतेतूनच झाला फल ज्योतिष शास्राचा जन्म अस नक्कीच म्हणता येईल.प्राचीन ऋषी मुनींनी आपल्या सुश्म निरिक्षणाने आणि अनुभवावे या फल ज्योतिष शास्राचा पाया घातला.
जर चंद्र हा समुद्रावर आपल्या जवळ येण्याने किंवा दूर जाण्याने भारती ओहोटी आणू शकतो तर मग मनुष्यावर याचा नक्कीच प्रभाव पाडू शकतो..... आयुर्वेदात सांगीतल्या प्रमाणे अनेक वनस्पती एका विशिष्ट मुहूर्तावर काढाव्यात किंवा त्या वेळी त्यांपासून औषधाची निर्मिती करावी असा उल्लेख ब-याच ठिकाणी सापडतो. असे का याचा शोध ज्यावेळी घेतला गेला तेव्हा लक्षात आले कि त्या वेळी त्या वनस्पतीत औषधी घटक सर्वात जास्त प्रमाणात असतात इतर वेळे पेक्षा . असा जर असेल तर मग हे ग्रह मनुष्यावर का परिणाम करू शकत नाही ?????
नक्कीच याचा परिणाम होत असावा तर मग कसा??? या कसा तून निर्माण झाल फल ज्योतिष शास्र. आणि मग निर्माण झाले ते याचे अभ्यासक मागील लेखात आपण बघितले कि त्यांची नाव त्याच येथे पुनरुल्लेख टाळून मी विषय पुढे नेतो.
आजही फल ज्योतिष शास्रात संशोधन सुरु आहे. आपले आजचे जीवन खूप स्पर्धात्मक झाले आहे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं श्रीमंत व्हायचं आहे , करियर साठी अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत नक्की कश्यात कारीयर कराव? हा मोठा प्रश्न समोर उभा असतो .सोपा रस्ता कोणता कि ज्याने जीवन सुखी समाधानी होईल ? या कडे सगळ्यांचा कल असतो. नक्की काय चुकतंय कि ज्यामुळे सारख अपयश येतंय??? सतत चिंता अश्यावेळी मनुष्य यावर उपाय शोधू लागतो आणि सगळ करून झाल आणि तरी हि नाही फरक पडत ये अशा वेळी मग तो एखाद्या ज्योतिष्याचा शोध घेतो.अशा याच्यात जर योग्य मार्गदर्शक मिळाल तर ठीक नाही तर उगीचच त्याला भीती धाखावून त्याकडून पैसे कमावले जातात .... कालसर्प-, सारखे अस्तित्वात नसलेले पण भयानक असलेले साप दाखवले जातात.आणि मग सुरु होते ती लुटालूट...........
वास्तविक पाहता खर फल ज्योतिष शास्र हे मनुष्याच्या दुखाचे निवारण करण्यासाठी आहे ना की व्यवसायासाठी.हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे . ज्याप्रमाणे एखाद्याकडे तलवार आहे ती त्याने कशासाठी वापरावी हा ज्याचा त्याचा विषय त्याप्रमाणे ज्ञानाचे देखील आहे.
एकूणच काय तर फलज्योतिष शास्र हे एक भविष्याच्या संदर्भात अंदाज घेवून सुकर मार्ग निश्चित करण्याचे साधन आहे. मार्गदर्शक म्हणून खूप चांगला उपयोग या शास्राचा होवू शकतो.....आणि तो तेवढाच राहावा...
दुस-या प्रश्ना बद्दल बोलायचं तर हा संपूर्ण अनुभवण्याचे शास्र असल्याने प्रत्येकाने तो घेवून बघावा आणि स्वत: ठरवावे. फक्त एकाच विनंती आहे कि हा अनुभव घेतांना तो योग्य व्यक्ती कडून घ्यावा हे महत्वाचे..........
लेखक :- प्रशांत अनिल भार्गवे
 
|सदस्य = 106.78.207.138
|नोंद_करणारा = Mahitgar
}}
जोतिष शास्त्र.
 
== sant ==
 
११:१४, ११ ऑगस्ट २०१४ (IST)Sahadevसन्त्
आपन् काय् लिहिनार् सन्त् म्हन्जे काय्?
 
== निरगुडी एक औषधी वनस्पती ==
<big>
''<big>निरगुडी</big>''</big>
या वनस्पतीचा वापर शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर कुंपण म्हणून करतो. निरगुडी या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.<br />
औषधी उपयोग :- <br />
१.शरीरावर कोणत्याही भागावर सूज आली असता त्या ठिकाणी निरगुडीच्या पाल्याचा शेक द्यावा.सूज कमी होण्यास मदत होते.<br />
२.ज्यांना संधिवाताचा त्रास आहे असे रुग्ण निरगुडीचा पाला गरम करून त्या भागात लावावा किंवा निरगुडी तेलाने मसाज करावी.<br />
३.ज्यांना लघवी होत नाही अशांनी निरगुडीच्या पाल्याचा काढा करून दिवसात ३-४ वेळा घेतल्यास लघवी व्यवस्थित होते.<br />
४.शरीरावर जखम झाली असता त्यावर निरगुडीचा उबवलेला पाला बांधावा.<br />
५.हाताला व पायाला कुरूप झाले असता त्या कुरुपावर ३-४ दिवस पाला गरम करून बांधल्यास कुरूप मुळापासून निघते.<br />
६.निरगुडीच्या पाल्याचा काढा ताप येणाऱ्या रुग्णाला दिला असता फायदा होतो.<br />
७.निरगुडीच्या पाल्याचा काढा प्याल्याने पचनशक्ती वाढते.<br />
८.कान दुखत असल्यास निरगुडीचे तेल कानात सोडल्यास फायदा होतो.<br />
९.निरगुडी चा पाला+फळ+फुल यांचा ज्यास्त उकळून तयार केलेला काढा नियमित घेतल्यास आरोग्यदायी शरीर ठेवता येते <br />
तसेच दमा,क्षय,खोकला,उलटी अपचन या विकारांपासून मुक्तता मिळते.<br />
१०.हातापायांच्या तक्रारीवर निरगुडीचे तेल लाभदायक आहे.<br />
११. स्रियांना मासिक पाळीचा त्रास असेल तर याचा काढा घेतल्यास त्रास दूर होतो.<br />
--ढवळे सुधीर रामचंद्र १४:२८, ११ नोव्हेंबर २०१४ (IST)
 
Simon de Beavoir चं The Second Sex
या पुस्तका बद्दल काही माहिती मिळू शकते का? मराठी मध्ये -
 
== समजा काळा पैसे चलनात आला नाही तर सरकार काय उपाय योजना करेल ? ==
 
काळ्या पैशामुळे चलन फुगवटा झाला !आता असे समजू हा पैसे चलनातून बाद झाला ! आता चलनात कमी पैसे येईल कारण रोखीने होत असलेले काळ्या पैशाचा व्यवहार थांबेल !त्या मुळे मंदी येईल !आणि स्वस्ताई होईल आणि आणि जर पैसा चलनात आला नाही आणि त्या मुळे काळ्या बाजाराला स्थान मिळेलं का ??? सरकार मंदी घालवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला नवीन नोटा छापण्यासाठी आणि त्यातून गडकरी जे म्हणता आहेत इन्फ्रास्टक्चर त्या साठी पैसे उपलब्ध केला जाईल त्यातून चलन वाढ होऊन मंदी वर मात करता येईल का ?!आणि मग महागाई वाढीला लागेल कि कमी होईल ?असे होणार असेल तर चलनवाढ करण्याची सरकारला गरज भासेल का ???समजा काळा पैसे चलनात आला नाही तर सरकार काय उपाय योजना करेल ? सरकार चलनी नाणे म्हणून सोने वापरणाऱ्या लोकांना ते किती सोने घरात ठेवू शकतील याबाबत काही कायदा करेल का ??त्याचा परिणाम काळा बाजार करणाऱ्यावर सरकार सोन्याच्या दरावर आणि विक्रीवर बंदी आणेल का ?
 
== शेतकरी कर्जमाफी ==
 
शेतकरी आंदळणाला लागलेले वळण आणि विरोधी पक्षांचा गदारोळ यामुळे महाराष्ट्र सरकारला संपूर्ण कर्जमाफी करणे भाग पडले.
माझ्या दृष्टिकोनातून हे अतिशय चुकीचं पाऊल आहे. यातून कुणाचे भले होणार नाही. मात्र महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला मात्र खीळ बसेल असं माझे मत आहे.
तुम्हाला काय वाटतेय?................--[[सदस्य:अनिल दातीर|अनिल दातीर]] ([[सदस्य चर्चा:अनिल दातीर|चर्चा]]) १०:२८, १३ जून २०१७ (IST)