"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
ओळ ५०:
पुढे १९९३ मध्ये सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफिकल (graphical) इंटरनेट ब्राऊझर उपलब्ध झाला. खरे तर सर्वात पहिला इंटरनेट ब्राऊझर नव्हता. पण तो जास्त तांत्रिक गुंतागुतीचा नव्हता आणि त्यामुळे वापरायला अतिशय सोपा होता. लगेचच तो सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राऊझर बनला. १९९३ मध्येच अमेरिकेतील व्हाईट हाउस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या. त्यामुळे तेव्हाच्या वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच .gov आणि .org या दोन वेबसाईटच्या नामप्रकारांची निर्मिती झाली. १९९४ मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राऊझरला नेटस्केप नॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राऊझर तयार झाला.
 
१९९५ मध्ये बँकेचे तसेच क्रेडिट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राऊझर आवश्यक भासू लागला. या आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीनेच सुरक्षित असा SSL (Secure Sockets Layer) प्रणाली असलेला ब्राऊझर तयार केला. कारण याच साली Echo Bay या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणार्‍या वेबसाइटची निर्मिती झाली. ती आज eBay नावाने ओळखली जाते. याच साली Amazon.com या वेबसाइटची देखील निघाली. असे असले तरी जवळपास ६ वर्षांपर्यंत म्हणजेच २००१ पर्यंत या वेबसाइटला कुठलाच आर्थिक फायदा झाला नव्हता. १९९५ मध्येच सर्वसामान्यांना देखील इंटरनेटवर आपली मोफत वेबसाइट बनविता यावी यासाठी Geocities या वेबसाइट निर्माण झाली. मात्र ती २००९ च्या वर्षात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे बंद करावी लागली. याच साली नेटस्केप नॅव्हिगेटर ब्राऊझरच्या माध्यमातूनच सर्वप्रथम जावा आणि नंतर जावास्क्रिप्ट या प्रोग्रॅम प्रणालींप्रणाली ब्रेंडन ईच (Brendan Eich) याने नेटस्केप नॅव्हिगेटरचा एक भाग म्हणून बनवल्या..
 
१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल (HoTMaiL) या ऑनलाईन मोफत ई-मेल सेवा सुरू झाली. १९९७ मध्ये "weblog" या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची निर्मिती केली गेली.
"https://mr.wikipedia.org/wiki/महाजाल" पासून हुडकले