"महादजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २९:
===वडगावची लढाई===
 
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mythaktvindia.in/2018/12/mahadaji-scindhia-the-de-facto-ruler-of-delhi.html|शीर्षक=Mahadaji Scindhia- दिल्ली पर हुकुमत चालाने वाला मराठा|last=India|पहिले नाव=Mythak Tv|संकेतस्थळ=Mythak Tv- Hindu Mythology And History|भाषा=HN|अॅक्सेसदिनांक=2019-01-09}}</ref>
 
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली