"मीनप्पा व्यंकटेश केलवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
मीनप्पा व्यंकप्पा केलवाड ऊर्फ गोविंदशर्मा (जन्म : कृष्णापूर-हैदराबाद, इ.स. १८६३; मृत्यू : [[हैदराबाद]], इ.स. १९२०) हे एक मराठी संगीतज्ञ व आद्य संगीत लिपिकार होते. ते मूळचे रायपूरजवळच्यारायचूरजवळच्या कनगिरीचे. मीनप्पांनी संगीत लेखन पद्धतीला आधुनिक वळण दिले. त्यांचे शिक्षण [[बडोदा|बडोद्याला]] झाले. योगीश्वर वामनबुवांकडून त्यांनी माणसाचे मस्तक तपासून त्याची योग्य लक्षणे जाणण्याची विद्या आत्मसात केली. आजोबा व गुरू यांचे संगीतप्रेमही मीनप्पांमध्ये उतरले. [[बडोदा|बडोद्याचे]] गायक-वादक मौलाबक्ष धिस्सेरखाँकडे ते प्रथम गायन व आवाज बिघडल्यानंतर वादन शिकले.
 
[[म्हैसूर]] महाराजांच्या संगीत कचेरीचे ते निमंत्रित सल्लागार होते. त्यांनी अनेक वर्षे लिहिलेली रोजनिशी खूप उद्‌बोधक आहे. तिच्यात मौलाबक्षांनी मीनप्पांच्या संगीतलिपीवरून स्फूर्ती घेतली होती असा उल्लेख आहे.