"रिदम वाघोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता
Content deleted Content added
नवीन पान: '''रिदम वाघोलीकर''' (२४ सप्टेंबर, इ.स. १९९३ - ) या भारतीय लेखक, टॉक श...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
(काही फरक नाही)

१६:०१, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

रिदम वाघोलीकर (२४ सप्टेंबर, इ.स. १९९३ - ) या भारतीय लेखक, टॉक शोचे सूत्रसंचालक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. कला, चित्रपट आणि लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी जे योगदान केले त्याच्यासाठी ते ओळखले जातात. वाघोलीकर यांनी लता मंगेशकर, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर पुस्तके लिहिली आहेत[१] आणि ते ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ नावाच्या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.[२]

त्यांना ब्रिटीश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘महात्मा गांधी सन्मानाने’ पुरस्कृत करण्यात आले आहे.[३] शिवाय, फेमिना नियतकालिकाच्या २०१८ च्या सर्वात शक्तिशाली लोकांच्या सूचित त्यांना सामील करण्यात आले आहे.[४][५]

कार्ये

वाघोलीकर ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ नावाच्या एका सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करते. रिदम यांनी आतापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०१७ मध्ये प्रकाशित झालेले, स्वरलता—रिदमिक रेमिनिसेस ऑफ लता दीदी, हे पुस्तक सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित आहे. ग्रामोफोन डिस्कच्या अनोख्या आकारात छापण्यात आलेले हे जगातील पहिलेच पुस्तक आहे.[६][७]

वाघोलीकरांचे दुसरे पुस्तक वर्ष २०१८ मध्ये प्रकाशित झाले. हे पुस्तक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या गायिका किशोरी आमोणकर यांच्यावर आधारित आहे.[८][९][१] माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, लता मंगेशकर, पंडित बिरजू महाराज यांच्यासारख्या मान्यवरांनी त्यांच्या कार्यांसाठी त्यांचे कौतुक केले आहे.[३] वाघोलीकरांचे आगामी पुस्तक ट्रांसजेंडर समुदायावर आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर आधारित असणार आहे.[१०]

पुरस्कार व सन्मान

  • त्यांना ‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) या संस्थेकडून २५ ऑक्टोबर २०१८ रोजी लंडनच्या ब्रिटीश पार्लमेंटमधील, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘महात्मा गांधी सन्मानाने’ पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे, वाघोलीकर हे सर्वांत तरुण भारतीय आहेत.[११][३]
  • जुलै २०१८ मध्ये फेमिना नियतकालिकाने रिदम वाघोलीकरांना ‘फेमिना मोस्ट पॉवरफुल ऑफ द ईयर २०१८’ या पुरस्काराने सन्मानित केले.[४]
  • डिसेंबर २०१७ मध्ये वाघोलीकरांना ब्लिस इक्विटी प्रकाशनने अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते ‘वॉव’ पुरस्काराने सन्मानित केले.[१२]
  • दुबई येथे २८ एप्रिल २०१८ रोजी, संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या इंटरनॅशनल अचीव्हर्स समिटमध्ये रिदम वाघोलीकरांना वाणिज्य सचिव अब्दुल्ला अल सालेह यांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल अचीव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले.[१३]
  • याशिवाय, वर्ष २०१५ मध्ये त्यांना इस्मा इन्स्टिट्यूटद्वारे (इंटरनॅशनल स्पीरिच्युअलिटी मार्केट) अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार मिळाले आहेत.[१४][३]
  • यांव्यतिरिक्त त्यांना आसिआन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप परिषदेद्वारे ‘युवा उद्योजक सन्मान’ प्राप्त झाला आहे; शिवाय, त्यांना ‘कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार’[१५], आणि ‘सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार’ यांद्वारे सन्मानित करण्यात आलेले आहे.[३]

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b http://www.lokmat.com/pune/kishori-amonkar-recollection-book/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/gauri-sawants-public-interview/articleshow/64082184.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b c d e http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5005739754061807703. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b https://www.femina.in/achievers/femina-punes-most-powerful-2018-19_-98634.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/manisha-lataad-to-be-given-commander-honor/articleshow/65123921.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ https://indianexpress.com/article/cities/pune/puneites-coffee-table-book-on-lata-mangeshkar-released-4732466/. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ https://mpcnews.in/pune-88-88-48989/. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kishori-amonkar/articleshow/62744012.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kishori-amonkar/articleshow/62744012.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ बरुआ, अनन्या. https://www.hindustantimes.com/pune-news/motherhood-is-beyond-gender-says-pune-s-first-transgender-mother-gauri-sawant/story-26uEhEvEqqXmXKuwcVfu1I.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ http://www.punekarnews.in/rhythm-wagholikar-awarded-mahatma-gandhi-sanman-in-a-function-held-at-british-parliament-3/. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5406603166506126112. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5633571329956379428. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ http://epaperbeta.timesofindia.com/article.aspx?eid=31814&articlexml=the-award-winning-tarot-expert-12042015109005. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ https://mpcnews.in/rhythm-wagholikar-and-rachana-khadikar-will-be-awarded-as-rashtriy-kalagaurav-puraskar-55999/. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे