"चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: दृश्य संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छो
खूणपताका: दृश्य संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
स्थापना - चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला , त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी स्वतःची एक लक्ष रुपयांची भर घातली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी व्यापार महाविद्यालय सुरु करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यावेळच्या 'रोटरी क्लब ऑफ सांगली' ने पुढाकार घेतला आणि हा रोटरीचा एक महत्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रम म्हणून हाती घेण्यात आला.दक्षिण महाराष्ट्रातील व्यापार उदिमाचे महत्वाचे केंद्र म्हणून ज्या धुरिणांनी सांगली येथे व्यापार महाविद्यालय सुरु व्हावे, हि मोठी दूरदृष्टी दाखवली,.
 
आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून प्रा. देवदत्त दाभोळकर यांनी अत्यंत समर्थपणाने मुहूर्तमेढ रोवली. अतिशय अभ्यासू, प्रशासनकुशल, समाजाभिमुख, असलेल्या प्राचार्य दाभोळकर सरांच्या विलक्षण नैतिक अधिष्ठानामुळे महाविद्यालयाचा भक्कम पाया घातला गेला. उद्घाटनप्रसंगी तत्कालिन उपराष्ट्रपती आणि थोर तत्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शुभाशिर्वाद खूप मोलाचे ठरले.
२७

संपादने