"गजानन दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
 
माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या ''गीत रामायणा''ने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. ''गीतरामायणा''च्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
 
ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता'या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत [[स्नेहल भाटकर]] यांनी दिले होते, आणि गायिका
[[ज्योत्स्ना भोळे ]] यांनी ती गायिली होती.
 
त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत ''पुढचं पाऊल'' (पटकथा, संवाद, गीते १९५०), ''बाळा जो जो रे'' (१९५१), ''लाखाची गोष्ट'' (१९५२), ''पेडगावचे शहाणे'' (१९५२), ''ऊन पाऊस'' (१९५४), ''मी तुळस तुझ्या अंगणी'' (१९५५), ''जगाच्या पाठीवर'' (१९६०), ''संथ वाहते कृष्णामाई'' (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).