"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
}}
 
'''मोहनदास करमचंद गांधी''' ([[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८६९]] - [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४८]]) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. '''महात्मा गांधी''' या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. [[रवींद्रनाथ टागोर]] यांनी सर्वप्रथम त्यांना ‘[[महात्मा]]’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने ''बापू'' म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे ''राष्ट्रपिता'' म्हटले जाते. [[सुभाषचंद्र बोस]] यांनी [[इ.स. १९४४]] मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी [[सत्याग्रह|सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे]] जनक होते. त्यांचा जन्मदिवस [[२ ऑक्टोबर]] हा भारतात ''[[गांधी जयंती]]'' म्हणून तर जगभरात ''[[आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन]]'' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात [[सार्वजनिक सुट्टी]] असते.
 
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेमध्ये]], तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. [[इ.स. १९१५]] मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. [[इ.स. १९२१]] मध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]ची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, [[अस्पृश्यता]] निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते [[मुस्लिम]]ांचे नेते बनले. [[इ.स. १९३०]] मध्ये [[इंग्रज|इंग्रजांनी]] लादलेल्या [[मिठ]]ावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब ''[[दांडी यात्रा|दांडी यात्रेमध्ये]]'' प्रतिनिधित्व केले. [[इ.स. १९४२]] मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध ''[[भारत छोडो आंदोलन]]'' चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.