"सुरेश भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४१:
 
==शिक्षण आणि काव्यलेखन==
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए. ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
 
त्यांच्या गझला व कविता [[हृदयनाथ मंगेशकर]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुरेश वाडकर]] आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.<ref>[http://www.samyaksanvad.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-declaration-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/| सुरेश सावंत याच्या मुलाखतीचा अंश]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/सुरेश_भट" पासून हुडकले