"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎रामबाण सुंठ: That is an extraordinary claim which requires extraordinary proof
ओळ ६:
 
==रामबाण सुंठ==
* सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये, म्हणून तिला हा पदार्थ खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असे औषध आहे.
* भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते.
* सुंठेच्या चूर्णात गूळ आणि थोडे तूप टाकून त्याचे तीन-चार तोळ्यांएवढे लहान लाडू बनवतात. ते लाडू रोज सकाळी खाल्ल्याने अपचन तसंच गॅसेसचा त्रास दूर होतो. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दीवरही हे लाडू गुणकारी आहेत. पावसात काम करणाऱ्या शेतकऱ्यासाठी किंवा सतत पाण्यात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुंठीचे लाडू अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर औषध आहे. यामुळे शरीरातली स्फूर्ती आणि शक्ती टिकून राहते.
ओळ १९:
सुंठीला ‘विश्वभेषज’ म्हणजे संपूर्ण जगाचे औषध असे म्हटले आहे. नुसत्या अनुपान भेदानेसुद्धा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगांवर सुंठ उपयोगी पडते. सुंठीचे प्रमुख उपयोग होतो तो पचन संख्येच्या सर्व विकारांवर हॊय.
 
पाव चमचा सुंठ पावडर आणि छोटय़ा सुपारीएवढा गुळाचा खडा व ते एकत्र करायला लागेल एवढे घरचे तूप, अशी गोळी करून ती नाश्ता आणि दोन्ही जेवणापूर्वी चावून खाऊन वर कोमट पाणी प्याल्यास भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, अपचन, मळमळ, पोट दुखणे, पोट जड होणे, गॅस, पोटात मुरडून संडासला होणे अशा सर्व तक्रारींवर अत्यंत उपयोग होतो. सुंठ घेतल्यावर पित्त होते, हा गैरसमज आहे. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य हे मधुर (गोड) गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे. आम्लपित्तात तर सुंठ हा हुकमी एक्का आहे.सुंठ, बडीशेप व खसखस समभाग पावडर करून तुपावर भाजून या सर्वाच्या एकत्र मिश्रणाएवढी साखर घालून अर्धा ते एक सपाट चमचा, दोन्ही जेवणाअगोदर कोमट पाण्याबरोबर घेतात.. पोटात मुरडून, कळ येऊन, थोडे थोडे पांढरे बुळबुटीत शौचास होणे, थोडय़ाशा निमित्ताने वारंवार पोट बिघडणे, बऱ्याचदा शौचाला गेल्यावर संडासाऐवजी नुसती पांढरी आंव पडणे या सर्वावर या मिश्रणाचा खूप उपयोग होतो. वारंवार ताप येत असेल तर त्याला तांब्याभर पाण्यात एक चमचा सुंठ घालून ते चांगले उकळवून तेच पाणी पिण्यास देतात. गर्भवतीलाही ताप आल्यास कोमट दुधातून सुंठ देतात. एक वाटी खडीसाखरेच्या पाकात एक चमचा भर सुंठ पावडर घालून एक कढ काढून थंड झाल्यावर तो ‘सुंठ पाक’ थोडा थोडा वारंवार चाखाल्यास वारंवार येणारा खोकला किंवा खोकल्याची ढास लगेच थांबते. सुंठ, ज्येष्ठमध व सीतोपला चूर्णही मधातून चाटवल्यास बरम्य़ाच दिवसांचे खोकले बरे होतात. यावरूनच सुंठीवाचून खोकला गेला ही म्हण तयार झाली.
 
==सुंठपाक==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंठ" पासून हुडकले