"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सुंठ''' म्हणजे सुकविलेले [[आले]]. आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक अत्यंत गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो. सुंठीची कढी ही अतिसाराच्या विकारावर गुणकारी ठरते.
 
आले वाळवल्याने सुंठ तयार होते. त्यामुळे आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. सुंठेमुळे यकृतातील पित्त चांगल्या प्रकारे स्रवते. सुंठेत ‘उदरवातहारक' गुण असल्याने जुलाबाच्या (विरेचन) औषधामध्ये ती मिसळतात. पचन संस्थेसाठी सुंठ अत्यंत उपयुक्त आहे. वृद्धावस्थेत पचननिक्रिया साधारणत: मंदावते, पोटात वायू निर्माण होतो, कफप्रकोप होतो, हृदयात धडधड होते, हात-पाय दुखतात. अशा स्थितीत सुंठेचे चूर्ण दुधातून घेणे फायदेशीर असते. कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी असते. सुंठेमध्ये अनेक उत्तम गुणधर्म असल्यानेच तिला ‘महौषधी' असे नाव देण्यात आलं आहे. ती पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते. कफ, वायू आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुंठेमुळे दूर होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंठ" पासून हुडकले