"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जांभूळ :: Repeat information deleted
ओळ ३३:
 
== '''जांभूळ :''' ==
जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्‍ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
 
जांभूळ हा अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करतात व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घेतात. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवून एक वर्ष जाऊ देतात. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव एका वेळेस अर्धा तोळा पण चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणार्‍या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.जम्भूलामुळे दात घट्ट होतात
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले