"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
 
==उपयोग==
हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो.
जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्र्‍याशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायांतून लावलेला आहे. गणेश ,शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज ही एक लोकप्रिय नीतिकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते, ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बुकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले