"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
| लेखक =| प्रकाशक =महाअ‍ॅग्रो| दिनांक = ६ फेब्रुवारी २०११| अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते.
 
जांभळे किंवा जांभळापासून बनवलेले पदार्थ नियमित खाल्यामुळे यकृत मजबूत होते व मूत्राशयाचे आजार होत नाहीत. याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.
 
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणार्‍या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. महाभारतातल्या [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणार्‍या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले