"कुष्ठरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पूर्वानुमान: Because most of the times surgeries can be done. Dr. Anjan Day is an expert in it.
ओळ ३१:
 
==पूर्वानुमान==
कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. चेतामध्ये आणि अवयवामध्ये झालेले बदल प्रत्येक वेळी दुरुस्त करता येत नाहीत. कुष्ठरोग्याचे पुनर्वसन हा कुष्टरोगाच्या उपचारचा अविभाज्य भाग आहे. पुनरर्चना शस्त्रक्रिया , बिघडलेले अवयव दुरुस्त करणे हे अवघड कार्य शल्यतज्ञाना करावे लागते. कधी कधी अवयव पुन्हा कार्य करण्यापलिकडे गेलेले असल्याने शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही.
सर्वकष उपचारामध्ये रुग्णास स्वावलंबी बनविण्यावर भर दिलेला असतो. चेता मध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला असल्यास अवयवामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. संवेदना रहित अवयवाची काळजी घेणे याचे प्रशिक्षण रुग्णाना द्यावे लागते.( मधुमेही रुग्णामध्ये पायाची काळजी घेण्यास शिकवले जाते ) हातापायांच्या जखमा असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करावी लागते. पायाच्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यास जखमा जिवाणुसंसर्गाने चिघळतात. भौतिक चिकित्सा उपायाने हाता पायाची बोटे कार्यक्षम ठेवण्यास मदत होते. भारतात अशा रुग्णाना हातमागाचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे हात आणि पाय कार्यक्षम राहण्यास मदत होते. हात आणि पायाना आधार देण्यासाठी पूर्वरचित भाग बांधल्याने अवयवामधील सामान्य बिघाड आटोक्यात येतात. कुष्ठरोग्यासाठी खास पद्धतीची पादत्राणे बनवली आहेत. त्यामुळे पायास व्रण होणे टळते.
प्रतिबंध: त्वरित निदान आणि उपचार केल्याने इतिहास काळातील या रोगावर मात केली आहे. कुष्ठरोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीची तपासणी हा नवे रुग्ण होण्याचे थांबवण्याचा उत्तम मार्ग आहे. अशा व्यक्तींची सतत पाच वर्षे तपासणी करणे गरजेचे आहे. काहीं ठिकाणी रुग्णाच्या सहवासातील व्यक्तीना प्रतिबंधक उपाय म्हणून डॅपसोन उपचार दिले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुष्ठरोग" पासून हुडकले