"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कलकत्ता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२ चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.
 
रोनाल्ड रॉस (जन्म :अलमोडा, इ.स.१८५७) यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.
 
डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो व त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले