"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(आशय जोडला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन :( रोमन लिपीत मराठी ?
छो
[[चिमाजी अप्पा]] हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. [[वसईची लढाई]] ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.
 
बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून [[मुंगीपैठण]] येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, [[नर्मदा]] तीरावर [[रावेरखेडी]] या गावी [[विषमज्वर|विषमज्वराने]] २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ [[घोडा|घोडे]] होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. फक्त ४०वर्षांच्या जीवनात ४७ लढाया जिंकल्या. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
 
बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. पालखेडची निजामाविरोधातील मोहीम, त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याची बैल खाऊ लागले(?). बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली हादरली. परंतु 'दिल्ली' जिंकल्यावर मराठा भगवा न फडकवता बाजीरावांनी मोर्चा मुघल प्रदेशाकडे वळविला, त्यात पेशावर,बलुचिस्तान,कंदाहार आणि काबुल येथे जाऊन मुघल प्रदेशावर कब्जा केला. तसेच कर्नाटक, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध् रप्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. या मुलखात मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त बाजीराव पेशवे.
 
==निधन==
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून [[मुंगीपैठण]] येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, [[नर्मदा]] तीरावर [[रावेरखेडी]] या गावी [[विषमज्वर|विषमज्वराने]] २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.प्रचंड पराक्रमी वर्णनातीत विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असे हे थोरले बाजीराव आदर्श राष्ट्रपुरुष होते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन झाले. बाजीरावांच्या निधनाची खबर मिळताच खुद्द निजामही रडला. [[सर जदुनाथ सरकार]] लिहितात, (इ. स. १९४२) 'अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झाला असे दिसते.'
 
== बाजीराव राजवटीतील मराठा साम्राज्याचा विस्तार==

संपादने