"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: संदर्भ यादी
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ९१:
संगमनेरमध्ये बनलेली पहिली दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा’ ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
 
संगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट ‘फुल टू धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले [[नामदेवराव जाधव]] यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली ‘कहा है मुस्कान?’ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्म्स केल्यानंतर आज २०१७ साली ते ‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतो आहे.
 
कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शॉर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तोही दिग्दर्शन क्षेत्रात उतरला..त्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवले आहे. ॲड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे. केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे, अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे, अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रतच्या काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले