"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व [[भडोच]]चे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी [[अमरावती]] जिल्ह्यातील [[देऊळवाडा]] येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ७</ref>
 
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव [[रिद्धिपूररिद्धपूर|ऋद्धिपूर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभू]] दिसले. [[गोविंदप्रभू|गोविंदप्रभूंपासून]] हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.<ref name="leela7"/> याचवेळी [[गोविंदप्रभु|गोविंदप्रभूंनी]] त्यांना चक्रधर हे नाव दिले.<ref>संकपाळ (२००९) पृ. १२</ref>
 
==एकाकी भटकंतीचा काळ==
[[गोविंदप्रभू|गोविंदप्रभूंपासून]] शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. [[आंध्र प्रदेश]]ाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.<ref>[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ११ आणि १४</ref> यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात चक्रधरांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी तर ते गाईच्या गोठ्यात जाऊन झोपले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा ११</ref> एका प्रसंगी [[वरंगळ]] येथील एका घोड्याच्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा १६</ref> गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी [[वडनेर]]चे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्यपरिवार मिळाला.
 
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची [[मेहकर]] येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना [[देवकी]] व स्वतः [[श्रीकृष्ण]] बनवून त्यांनी [[मेहकर]] येथे [[गोकुळाष्टमी]] साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी [[लोणार]]ची यात्राही केली. नंतर एके दिवशी [[सिंहस्थ]] यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर [[त्र्यंबकेश्वर]]ला जाण्यास निघाले. वाटेत [[पैठण]] येथे त्यांनी [[त्र्यंबकेश्वर]]ास जाण्याचा बेत रद्द करून [[पैठण]] येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.<ref name="sankpal27">संकपाळ (२००९) पृ. २६-२७</ref> अशा तर्‍हेनेतऱ्हेने [[रिद्धपूर|ऋद्धिपुरापासून]] सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण [[पैठण]] येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.
 
एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.<ref name="sankpal27"/>