"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’नेही रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केलेत. दोन घटका मस्त करमणूक ते करतात. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री हे व्यंगचित्रांच्या आधारे रसिकांना हसवितात.. संतोष चोरडिया ‘कॉमेडी चॅनल’ रंगवतात. त्यात ते धापा टाकत पळणार्‍या माणसाची नक्कल करतात. प्रकाश पारखी हे कोंबडी, घोडागाडी, शेतावरल्या मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज पेश करतात.
 
२००१ साली स्व. [[मधुकर टिल्लू]] यांच्या स्मृती निमित्त पुण्यात एकपात्री कलाकार एकत्र आले व त्यातून एकपात्री कलाकार संघ स्थापन झाला. नंतर त्यातूनच ' एकपात्री कलाकार परिषदेची' स्थापना झाली. २००६साली एकपात्री कलाकार परिषदेच्या [[मकरंद टिल्लू]] यांच्या पुढाकाराने नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. 'एकपात्री कलाकार परिषद' संस्थेचे २००७ सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार' संघटना स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली होती. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले.
 
वर्षातून एकदा, बहुधा २१ एप्रिलला, अनेक एकपात्री कलाकार एकत्र येऊन ’आम्ही एकपात्री’ संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतात. [[बंडा जोशी]] या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
 
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, [[मकरंद टिल्लू]] यांचा'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम ! टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या इ.स. १९६१ पासून एकपात्री सादर करीत आहेत. स्व.[[मधुकर टिल्लू]] , मुलगा मकरंद टिल्लू व नात हर्षदा टिल्लू गेली 57 वर्षे एकपात्री करत आहेत. हे रंगभूमीवर प्रथमच घडणारी घटना आहे.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]{{मृत दुवा}}
 
डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांची निर्मिती करते. या प्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये नोंद झाली आहे.