"म्यानमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
ओळ ४९:
==धर्म==
{{मुख्य|म्यानमारमधील धर्म}}
 
==अधिक माहिती ==
भारता मधून पासपोर्ट शिवाय भारतीय नागरिकाला भारता बाहेर जाता येते असे जे थोडे देश आहेत त्यापैकी एक म्हणजे बर्मा म्हणजेच ब्रम्हदेश म्हणजेच म्यानमार! सीमेवरून त्या देशात चक्क चालत जात येते. भारतातल्या मणिपूर राज्याला या देशाची सीमा लागलेली आहे. मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावा पासून रस्त्याने ३ तास प्रवास केला १०७ किलोमीटर अंतर गेले की मोरेह गाव लागते. हे भारतातले शेवटचे गाव आहे. तिथे सीमा ओलांडून आपण बर्मी नाम फा लॉंग बाजार या ठिकाणी पोचतो. या दोन ठिकाणांना जोडणारा एक छोटासा रस्ता आहे आणि त्यात दोन कमानिंच्या मध्ये एक टोल बूथ उर्फ चौकी आहे. तिथे भारतीय असल्याचे कुठलेही ओळखपत्र दाखवले की सीमा ओलांडता येते व तुम्ही म्यानमार मध्ये प्रवेश करू शकता!
 
या सीमेवर इमिग्रेशनचा अधिकारी नेमलेला आहे. माणशी 20 रु. जमा केले की इमिग्रेशनची पावती मिळते. या पावतीवर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत बर्माच्या भागात थांबटा येउ शकते. भारत व बर्मा या दोन देशांमधली सीमा सकाळी ६.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळात चालत ओलांडायला खुली असते. त्यानंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही.
 
इंफाळ या भारतातल्या त्यातल्या त्यात मोठ्ठ्या बाजार पेठेच्या तुलनेने इकडच्या वस्तू बऱ्यापैकी स्वस्त आहेत म्हणून भारतातले अनेक जण अगदी छोटे व्यापारी सुद्धा चौकीपलीकडच्या मार्केट मध्ये जाऊन भरपूर खरेदी करतात (electronics मात्र नाही) आणि चालत परत येतात. इथे सीमेपर्यंत येताना आणि जाताना निदान चार वेळा तरी भारतीय सैन्यात कडून थांबवले जाते. एकदा प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जाते. निदान एकदा तरी सगळ्यांना उतरवून गाडीची तपासणी होते. ह्या तपासणीच्या वेळी मुख्यतः अवैध गोष्टी म्हणजेच ड्रग्ज किंवा काही हत्यारे जात नाहीत ना याची पडताळणी केली जाते.
 
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/म्यानमार" पासून हुडकले