"पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
वर्ग:क्रिकेट टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो (वर्ग:क्रिकेट टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
{{वर्ग}}
'''पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली''' (संक्षिप्त रुप '''युडीआरएस (UDRS)''' किंवा '''डीआरएस (DRS)''') ही [[क्रिकेट]]मध्ये वापरली जाणारी एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. [[फलंदाजी|फलंदाज]] बाद झाला आहे किंवा नाही ह्या मैदानावरील [[पंचगिरी|पंचांच्या]] वादग्रस्त निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या एकमात्र उद्देशाने सदर प्रणाली ही सुरुवातीला [[कसोटी क्रिकेट]] मध्ये वापरली गेली. सन २००८ च्या भारत वि. श्रीलंका सामन्यामध्ये सर्वप्रथम ह्या प्रणालीची चाचणी घेण्यात आली,<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://sports.ndtv.com/cricket/news/53230-umpiring-decision-review-system-on-the-cards|शीर्षक=नवीन पुनरावलोकन प्रणालीची चाचणी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६|दिनांक=२२ जून २००८|प्रकाशक=एनडीटीव्ही स्पोर्ट्स|कृती=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया}}</ref> आणि त्यानंतर [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]ने २४ नोव्हेंबर २००९ रोजी [[युनिव्हर्सिटी ओव्हल]], [[ड्युनेडिन]]येथे सुरू झालेल्या [[न्यूझीलंड|न्यूझीलंड क्रिकेट संघ]] आणि [[पाकिस्तान|पाकिस्तान क्रिकेट संघ]] दरम्यानच्या पहिल्या कसोटीमध्ये अधिकृतपणे ही प्रणाली सुरू केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://cricketnext.in.com/news/decision-review-system-set-for-debut/45336-13.html |शीर्षक=निर्णय पुनरावलोकन प्रणाली पदार्पणासाठी सज्ज|दिनांक=२३ नोव्हेंबर २००९|प्रकाशक= क्रिकेटनेक्स्ट.इन |भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricinfo.com/ci-icc/content/story/436290.html |शीर्षक=सुधारित पुनरावलोकन प्रणालीचे अधिकृत पदार्पण |दिनांक=२३ नोव्हेंबर २००९|प्रकाशक= क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref> [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट]]मध्ये सदर पद्धत जानेवारी २०११ मध्ये [[इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१०-११#एकदिवसीय मालिका|इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान]] वापरण्यात आली.<ref name="ODI_Referrals">{{स्रोत बातमी |शीर्षक=ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली जाणार|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/9361306.stm |कृती=बीबीसी स्पोर्ट |प्रकाशक=ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन|दिनांक=१६ जानेवारी २०११|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref> सुरुवातीला आयसीसीने युडीआरएस प्रणाली सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंधनकारक केली होती,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=हॉट-स्पॉट नंतर डीआरएस बंधनकारक |दुवा=http://www.espncricinfo.com/ci-icc/content/current/story/520913.html|प्रकाशक=क्रिकइन्फो|दिनांक=२७ जून २०११|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref> परंतू नंतर त्याचा वापर ऐच्छिक केला गेला, त्यामुळे जर दोन्ही संघांची सहमती असेल तरच प्रणाली वापरली जाईल असे घोषित करण्यात आले. आयसीसीने तंत्रज्ञानावर काम सुरू ठेवण्याचे आणि आयसीसीच्या सर्व मालिकांमध्ये सदर प्रणालीचा वापर अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.weeklytimesofindia.com/sports-news/no-mandatory-use-of-decision-review-system-says-icc/ | कृती=द टाईम्स ऑफ इंडिया | शीर्षक=निर्णय पुनरावलोकन प्रणाली बंधनकारक नाही, आयसीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=२८ सप्टेंबर २०१६}}</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी|3}}
 
[[वर्ग:क्रिकेट]]
२९,७८८

संपादने