"सुशी (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
नारेझुशी नावाच्या एका मूळ चीनी पदार्थापासून सुशीची उत्पत्ति झाली आहे. चीनमध्ये इसविसनाच्या दुसर्‍या शतकपासून आंबवून साठवलेल्या कडक तांदूळात खारवलेले मासे दीर्घकाळ मुरवले जायचे. तांदुळामुळे मासे सडण्याची प्रक्रिया थांबवली जायची. हे मासे खाताना सोबत असणारा तांदूळ काढून टाकला जायचा. साधारण सातव्या शतकापर्यंत ही पध्दत संपूर्ण चीनमध्येच वापरली जाऊ लागली. जपानी लोकांनी माशाबरोबर असणारा तांदूळ सुद्धा खाण्यास सुरुवात केली<ref>https://www.sushifaq.com/basic-sushi-experience-information/the-history-of-sushi/</ref>. नाझेरुषी हा पदार्थ त्याच्या आंबट आणि उमामी (ही एक प्रकारची चव आहे जिच्यात खारट ,आंबट, गोड आणि तुरट चवींचे मिश्रण असते) चवीमुळे प्रसिद्ध होता.
 
मुरोमाची साम्राज्य (1336 ते 1573) या काळात नारेझुशी मध्ये शिरका म्हणजेच व्हीनेगर चा वापर करण्यास सुरुवात झाली. शिरका घातल्यामुळे पदार्थ अजून आंबट तर झालाच शिवाय दीर्घकाळ टिकण्यास मदत झाली. ओसकानामानारे या शिजवलेल्या भाताबरोबर मुरवलेले मासे खाण्याची पद्धत मुरोमची काळात लोकप्रिय झाली<ref>https://sushiref.com/history-of-sushi/</ref>. ओसाका शहरात अनेक शतके सुशी या पदार्थाचा विकास होत होता. सुरुवातीच्या काळात बांबूच्या साच्यात भात आणि मासे घालून त्यांना 'ओशी झुशी ' या नावाने ओळखले जायचे .
 
एडो साम्राज्य (1603 - 1868 )काळात शिरका घातलेला भात किंवा नोरी नामक समुद्री शेवाळ यावर ताजे मासे वाढून सुशी बनवण्याची पद्धत सुरू झाली<ref>https://sushiref.com/history-of-sushi/</ref>. आजकाल जपान मध्ये विशेष प्रसिद्ध असणार्‍या निगेरोझुशी या सुशीची सुरुवात टोकियो मध्ये रोगोक्यु नामक हॉटेलचा आचारी हानाया योहेइ याने 1824 मध्ये केली.
 
== '''सुशीचे काही प्रकार''' ==