"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
Isbn fix
ओळ ५७:
इ.स.च्या १४व्या शतकात मात्र मंगोलांचे विशाल साम्राज्य भंगण्यास सुरुवात झाली. चगाताय खानतीच्या प्रदेशातही सत्तासंघर्ष उद्भवला व अनेक छोट्या-छोट्या टोळ्यांचे प्रमुख सत्ता काबीज करण्यासाठी परस्परांत लढू लागले. या सत्तासंघर्षातून [[तिमूर]] (तैमूरलंग) नावाचा टोळीप्रमुख इ.स. १३८०च्या सुमारास मावाराननाहर प्रदेशातला प्रबळ सत्ताधीश बनला. चंगीझ खानाचा वंशज नसलेल्या तिमूराने मध्य आशियाचा पश्चिमेकडील भाग, इराण, आशिया मायनर, [[अरल समुद्र|अरल समुद्राच्या]] उत्तरेस असलेला स्टेप प्रदेशाचा दक्षिण भाग जिंकत राज्य विस्तारले. त्याने रशिया व भारतीय उपखंडावरही आक्रमणे केली. चीनवरील आक्रमणादरम्यान इ.स. १४०५ साली त्याचा मृत्यू झाला. तिमूराच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेस पोचला व राज्याची शकले पडण्यास आरंभ झाला. ही संधी हेरून अरल समुद्राच्या उत्तरेस राहणार्‍या भटक्या उझबेक टोळ्यांनी मावाराननाहरावर चढाया करण्यास सुरुवात केली व हा भाग व्यापला.
 
इ.स.च्या १९व्या शतकात [[रशियन साम्राज्य|रशियन साम्राज्याने]] मध्य आशियात राज्यविस्तार करण्यास आरंभले. इ.स. १८१३पासून इ.स. १९०७मधील अँग्लो-रशियन बैठकींपर्यंतचा ''मोठी शिकार'' म्हणून ओळखला जाणाऱ्या या काळात उझबेकिस्तानातील रशियन प्रभाव वाढत गेला. इ.स. १९१२मध्ये उझबेकिस्तानात २,१०,३०६ रशियन राहत होते<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''द न्यू रशियन डायास्पोरा: रशियन मायनॉरिटीज इन द फॉर्मर सोव्हियेट रिपब्लिक्स'' (''नवी रशियन डायास्पोरा: भूतपूर्व सोव्हियेत प्रजासत्ताकांमधील रशियन अल्पसंख्याक समाज'') | लेखक = व्लादिमिर श्लापेंतोख, मुनीर सेंदिच, एमिल पेयिन | प्रकाशक = एम.ई. शार्प, इन्कॉ., [[न्यू यॉर्क]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] | वर्ष = इ.स. १९९४ | पृष्ठ = १०८ | आयएसबीएन = 1-५६३२४56324-३३५335-0 | दुवा = http://books.google.com/books?id=Bg-dn0g0SikC&pg=PA108&dq&hl=en#v=onepage&q=&f=false | अ‍ॅक्सेसदिनांक = ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref>. रशियातील इ.स. १९१७मधल्या बोल्शेविक क्रांतीनंतर बोल्शेविक लोण मध्य आशियातही जाऊन थडकले. बोल्शेविकांना झालेल्या सुरुवातीच्या प्रतिकारानंतर उझबेकिस्तान व उर्वरित मध्य आशिया [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघात]] सामील झाला. २७ ऑक्टोबर, इ.स. १९२४ रोजी सोव्हियेत संघांतर्गत ''उझबेकिस्तानाचे सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक'' निर्मिण्यात आले. ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी उझबेकिस्तानाने सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. १ सप्टेंबर हा दिवस उझबेकिस्तानात ''राष्ट्रीय दिन'' म्हणून पाळला जातो.
 
== भूगोल ==