"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
Gandhi_and_Nehru_1942.jpg या चित्राऐवजी Gandhi_and_Nehru_in_1946.jpg चित्र वापरले.
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ११२:
=== दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन ===
[[चित्र:Quit India Movement.ogv|left]]
[[चित्र:Gandhi and Nehru 1942in 1946.jpg|thumb|right|पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. ८ ऑगस्ट १९४२. भारत छोडो आंदोलन. यानंतर लगेचच दुसरी दिवशी सकाळी गांधीना अटक करण्यात आली.]]
[[इ.स. १९३९]] मध्ये [[जर्मनी]]ने [[पोलंड]]वर आक्रमण केले आणि दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना 'अहिंसक नैतिक पाठिंबा' देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले.<ref>Patel: A Life, राजमोहन गांधी पृष्ठे २८३-२८६</ref> दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना 'भारत सोडून जा' ([[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो]]) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्‍न होता.<ref>Patel: A Life, राजमोहन गांधी पृष्ठ ३०९</ref>