"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎अंतःस्रावी ग्रंथी: अवटु व अधिवृक्क ग्रंथी
ओळ ४८:
 
=== [[अंतःस्रावी ग्रंथी]] ===
अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या अनेक संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे -१२च्या सुमारास मेंदूमधील अग्र [[पोषग्रंथी|पोषग्रंथीमधून]] ([[:en:Pituitary gland|Pituitary gland)]] [[पुटक उद्दीपक संप्रेरक]] (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - [[:en:Follicle-stimulating hormone|Follicle-stimulating hormone]]) व [[पीतपिंडकारी संप्रेरक]] (ल्युटिनायझिंग हार्मोन - [[:en:Luteinizing hormone|Luteinizing hormone]]) स्रवण्यास सुरुवात होते व त्यामुळे [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेची]] सुरुवात होते. पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाला चालना मिळते आणि शुक्रजंतू निर्मितीसाठी आवश्यक विशिष्ट प्रथिननिर्मिती करण्यासाठी ''''सर्टोली'''' पेशीं उत्तेजित होतात. तसेच पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे वृषणामधील अंतराली उतकामधील ''''लायडिग'''' पेशींमधून टेस्टोस्टेरोन हे पुरुषसंप्रेरक स्रवते. टेस्टोस्टेरोनमुळे सर्व जननेंद्रियांची वाढ होते आणि ती कार्यान्वित होऊन पुरुषाचा लैंगिक विकास पूर्ण होतो. पौगंडावस्थेमध्ये चालू झालेली शुक्राणू निर्मिती अखेरपर्यंत चालू राहते. फक्त वार्धक्यामध्ये शुक्राणु निर्मितीचा वेग कमी होतो.
 
याशिवाय लैंगिक अवयव व मुख्यतः दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाला अवटु व अधिवृक्क या अंतःस्रावी ग्रंथीचेही सहाय्य होते.
 
=== बाह्य पुरुष जननेंद्रिये ===