"सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
==जन्म व बालपण==
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी [[महाराष्ट्र|महाराष्]]ट्रातील [[वर्धा]] येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे.
गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरचे गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी त्यांना जेमेतेमजेमतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले.
 
==विवाह==
सिंधुताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह  झाला . घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.
अनामिक सदस्य