"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८९:
==== [[गर्भाशय]] ====
 
श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही स्नायूंची जाड पिशवी असून आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोनी असते. त्याच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याच्या खालच्या निमुळत्या ग्रीवेतून गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते.
ही स्नायूंची त्रिकोणी पिशवी आहे. गर्भाशयाचे स्नायू अनैच्छिक असतात. गर्भाशयाची जाडी दोन सेमी आणि लांबी ‍७.५ सेमी असते. गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये पोष ग्रंथीमधील संप्रेरकांच्या संहतिनुसार बदल होतो. गर्भाशयाचे मुख्य भाग आणि मानेसारखी निमुळती ग्रीवा असे दोन भाग असतात. ग्रीवा योनिमार्गामध्ये उघडते. गर्भाशयाचे मुख्य कार्य गर्भधारणा, गर्भाच्या वाढीस मदत करणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती आहे. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे कार्य गर्भाशयाचे आहे.
गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या प्रभावाखाली दरमहा बदल होतात. ते फलित बीजांडाच्या रोपणास व पोषणास योग्य असे असतात. फलित बीजांडाचे (गर्भाचे) रोपण झाल्यावर (गर्भधारणा) त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती ही गर्भाशयाची महत्त्वाची कामे आहेत.
 
==== [[योनी]] ====