"काळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[काळ]] आणि [[अवकाश]] ह्या दोन कल्पना भिन्न मानून आणि काळ ही "गत क्षण", "आत्ताच़ा क्षण", आणि "भावी क्षण" ह्या तीन संज्ञांनी निदर्शवलेल्या क्षणांची एक गूढ अनादिअनंत "फीत" असल्यासारखे समज़ून आपण [[माणूस|माणसे]] हज़ारो वर्षे रोज़चे व्यवहार करत आलो आहोत, पण विसाव्या शतकाचा सुरवातीला [[अल्बर्ट आइनस्टाइन]]ने प्रसिद्ध केलेल्या "तौलनिक सिद्धांता"नुसार काळ आणि अवकाश ह्या दोन कल्पना भिन्न नसून काळ-अवकाश ही एक ''संलग्न'' कल्पना आहे. (ह्या कल्पनेतल्या संलग्नतेच़े महत्त्व फक्त अतिसूक्ष्म आणि अतिविशाल घटनांच़ा विचार करतानाच़ तेवढे असते.) आइन्स्टाइनचा सिद्धांतानुसार काळ ही च़तुर्मितीय विश्वाचा चार [[मिती|मितींपैकी]] एक [[मिती]] आहे. उरलेल्या तीन [[मिती]] म्हणजे [[त्रिमितीय अवकाश|त्रिमितीय अवकाशाचा]] तीन मिती.
 
[[स्मृती]] आणि कल्पनाशक्ती ही माणसाचा अतिविकसित बुद्धीची दोन मुख्य अंगे आहेत. त्यांचामुळे "गत काळ" आणि ""भावी काळ" ह्या दोन कल्पना आणि त्या काळांमधल्या घटनांसंबंधी विचार आपण माणसे "आत्ताचा क्षणा"संबंधित विचारांसमवेत करू शकतो आणि सतत करत असतो. असे असूनही आपण सगळे आपापली आयुष्ये अनुभवत असतो फक्त ''आत्ताचा क्षणी''. प्रत्येक क्षणी "आत्ताच़ा क्षण" "गत काळा"तल्या क्षणांचा महासागरात गूढपणे विलीन होऊन "गत क्षण" ही संज्ञा धारण करत रहातो, आणि त्याच क्षणी एक गूढ "भावी क्षण" "आत्ताच़ा क्षण" अशा संज्ञेने क्षणमात्र राज्यारूढ होतो! हा एक सगळा सृष्टीतला महान चमत्कार खास आहे, पण [[आयुष्य]] जगण्याचा रोज़चा धांदलींमधे आपणा बहुतेक माणसांना त्या चमत्काराची ज़ाणीव क्वचितच़ असते.
 
== व्याख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/काळ" पासून हुडकले