"बीजांडकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
दुवे
ओळ १:
[[चित्र:Illu ovaryb.jpg|250px|इवलेसे|उजवे|गर्भाशयाच्या दोन्ही बाजुला असणारे बीजांडकोश]]
 
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये [[गर्भाशय|गर्भाशयाच्या]] डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. [[बीजांड|बीजांडनिर्मिती]] करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून [[इस्ट्रोजेन]] ([[:en:Estrogen|Estrogen]]) व [[प्रोजेस्टेरॉन]] ([[:en:Progesterone|Progesterone]]) ही [[संप्रेरक|संप्रेरकेही]] स्रवत असल्याने [[अंतःस्रावी ग्रंथी]] म्हणूनही ते काम करतात.
 
बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, [[पुटक उद्दीपक संप्रेरक]] (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - [[:en:Follicle-stimulating hormone|Follicle-stimulating hormone]]) व [[पीतपिंडकारी संप्रेरक]] (ल्युटिनायझिंग हार्मोन - [[:en:Luteinizing hormone|Luteinizing hormone]]) या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होते. हे संप्रेरक मेंदूच्या तळाशी असणाऱ्या [[पोष ग्रंथी|पोष ग्रंथीत]] (पिट्युटरी ग्रंथी - [[:en:Pituitary gland|Pituitary gland]]) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच [[बीजांडोत्सर्ग]] (ओव्ह्युलेशन - [[:en:Ovulation|Ovulation]]) असे म्हणतात.