"बीजांडकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
दुवे
ओळ १:
[[चित्र:Illu ovaryb.jpg|250px|इवलेसे|उजवे|गर्भाशयाच्या दोन्ही बाजुला असणारे बीजांडकोश]]
 
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये [[गर्भाशय|गर्भाशयाच्या]] डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. [[बीजांड|बीजांडनिर्मिती]] करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून [[इस्ट्रोजेन]][[प्रोजेस्टेरॉन]] ही [[संप्रेरक|संप्रेरकेही]] स्रवत असल्याने [[अंतःस्रावी ग्रंथी]] म्हणूनही ते काम करतात.
 
 
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. [[बीजांड|बीजांडनिर्मिती]] करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरकेही स्रवत असल्याने अंतःस्रावी ग्रंथी म्हणूनही ते काम करतात.
 
बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होते. हे संप्रेरक मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पोष ग्रंथीत (पिट्युटरी ग्रंथी - Pituitary gland) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन - Ovulation) असे म्हणतात.