"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६२:
शिश्नाच्या खालील बाजूस असलेली त्वचा व स्नायूंची सैल पिशवी म्हणजे वृषणकोश. वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणांचे संरक्षण करणे व त्यांचे तापमान नियंत्रित करणे ही कामे वृषणकोश करतो. वृषणामध्ये शुक्रजंतू निर्मितीचे कार्य शरीराच्या तापमानापेक्षा थोड्या कमी तापमानास सुरळीतपणे होते. वृषणकोशाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्नायूमुळे (क्रेमास्टर स्नायू - [[:en:Cremaster muscle|Cremaster muscle]]) वृषणकोश सैल किंवा आकसलेले राहण्यास मदत होते. थंडीमध्ये वृषणकोश आकसून वृषणे शरीराजवळ उबदार ठेवली जातात तर उन्हाळ्यात ती शरीरापासून थोडी दूर लोंबती ठेवल्यामुळे थंड राहतात. यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते. अति घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने वृषणकोशाचे तापमान शरीराएवढे होते आणि शुक्रजंतू निर्मितीमध्ये अडथळा येतो. शुक्रजंतूंची संख्या कमी होण्याचे हे एक कारण आहे.
 
== स्त्री प्रजननसंस्थेतील अवयवांची रचना व कार्यप्रजननसंस्था ==
 
बीजांड तयार करणे, त्याचे वहन करणे, संभोगाचे वेळी प्रवेश केलेल्या शुक्रजंतुंबरोबर त्याचा संयोग घडवून त्याचे फलन करणे, फलित बीजांडाचे (गर्भाचे) पोषण करणे, योग्य वेळी प्रसूती घडवून बाह्य जगात टिकाव धरू शकणारे अर्भक जन्माला घालणे आणि त्याला स्तनपान देऊन त्याचे पुढे पोषण करणे यासाठी स्त्री प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
 
स्त्री प्रजनन संस्थेमध्ये<ref name="स्त्री प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=स्त्री जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश स्त्री प्रजनन संस्थेत होतो.
 
बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी कुमारावस्थेपर्यंत जननेंद्रीयांची फारशी वाढ झालेले नसते. [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेत]] पोष ग्रंथी व बीजांडकोशांतून स्रवणार्‍या संप्रेरकांच्या प्रभावामुळे जननेद्रियांमध्ये झपाट्याने बदल होऊन ती विकसित होतात.
 
'''अवयवांची रचना व कार्य'''
 
स्त्री प्रजनन संस्थेमध्ये<ref name="स्त्री प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=स्त्री जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश स्त्री प्रजनन संस्थेत होतो.
 
=== अंतर्गत स्त्री जननेंद्रिये ===